शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहशतवादाविरुद्ध भारत-ट्युनिशिया एकत्र लढणार

By admin | Updated: June 4, 2016 02:38 IST

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ट्युनिशियाच्या दौऱ्यावर आहेत.

ट्युनिस : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ट्युनिशियाच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाचे धोके दूर करण्यास समान विचारधारा असलेल्या सहकाऱ्यांनी सहकार्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीब एस्सिदी यांच्यासोबत चर्चा केली. हस्तशिल्प आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एका करारावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अन्सारी म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने दहशतवादावर चर्चा केली. दोन्ही देश या संकटाचा सामना करीत आहेत. अन्सारी व एस्सिदी यांच्यात झालेल्या व्यक्तिगत स्तरावरील बैठकीनंतर दोन्ही देशांत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील बैठक झाली. तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित दोन करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या. अन्सारी म्हणाले की, आगामी पाच वर्षांत भारत ट्युनिशियातील ३५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान प्राप्त करण्यास भारताच्या प्रयत्नांना ट्युनिशियाने जे समर्थन दिले आहे त्याबद्दल अन्सारी यांनी समाधान व्यक्त केले.