शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील हल्ल्याला भारत जबाबदार, पाकच्या माजी मंत्र्याची मुक्ताफळे

By admin | Updated: January 21, 2016 13:15 IST

बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २१ - खैबर पख्तुनवा प्रांतातील चारसद्दा येथील प्रसिध्द बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे. 
आधी पाकिस्तान तालिबान संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती नंतर मात्र त्यांनी आपण या हल्ल्यामागे नसल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात विद्यार्थी, शिक्षकांसह २५ जण ठार झाले. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या धमकीला आपण गांर्भीयाने घ्यायला हवे होते. बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या हल्ल्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा  'रॉ' चा हात आहे. त्यांचा तेहरीक-ए-तालिबानबरोबर समझोता झाला आहे अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री राहिलेल्या रेहमान मलिक यांनी  पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना उधळली. 
मलिक यांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मदलाही क्लीनचीट दिली. पठाणकोट येथे झालेला दहशतवादी हल्ला जैश-ए-मोहम्मदने घडवलेला नाही. भारतातल्याच लोकांनी हा हल्ला घडवून आणला. भारत-पाकिस्तानमध्ये संबंध सुधारावेत अशी रॉ ची इच्छा नाही असे मलिक म्हणाले.