शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

भारत आमची प्रतिमा मलिन करतोय, पाकिस्तानचा कांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 19:14 IST

पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे, असा अपप्रचार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 25 - पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करत आहे, असा अपप्रचार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. काश्‍मीरच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच नरेंद्र मोदींचा हा खटाटोप सुरू असल्याचं सांगून पाकिस्तानने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधल्या कोझिकोड येथे घेतलेल्या जाहीर सभेत पाकिस्तानवर थेट टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. नरेंद्र मोदी पाकिस्तानची प्रतिमा मलिन करू पाहत आहेत. त्यामुळेच जाणूनबुजून भडकावणारी वक्तव्ये करून भारताचे नेते पाकिस्तानची जागतिक पातळीवर प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप पाकिस्ताननं पत्रकाद्वारे केला आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप निराधार आहे. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अशा प्रकारे राजकीय विधाने करणे चुकीचे असल्याचं त्या पत्रकात म्हटले आहे. काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कर करत असलेल्या अत्याचारांपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारत असे उद्याग करत असल्याचं पाकिस्तान म्हणाला आहे. दहशतवादी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्‍मीरमधील तरुण नेता असा केला. बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर काश्‍मीरमध्ये पुन्हा एकदा दडपशाही सुरू झाली आहे, असा दावाही पाकिस्तानने केला.