शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

By admin | Updated: September 28, 2016 00:57 IST

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी

बीजिंग : पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलिकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताला उघड विरोध करणारा चीन यानिमित्ताने आपली भूमिका बदलताना आता दिसत आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली असली, तरी काश्मीरसंदर्भात चीनने कधीही पाकच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही.गुप्तचर विभागाचे प्रमुख आर. एन. रवी आणि चीनच्या केंद्रीय राजकीय व कायदेविषयक विभागाच्या आयोगाचे महासचिव वांग योंगक्विंग यांच्या अध्यक्षतेत ही चर्चा झाली. भारतीय दूतावासाकडून येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांनी आपली पद्धत, धोरणे आणि कायदेविषयक माहितीची देवाणघेवाण केली. संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करण्याचे उपाय, दहशतवादाविरुद्ध लढाई आणि सुरक्षेबाबत सहकार्य या विषयावर दोन्ही देशांत चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकवटल्याचा संदेश यातून गेला आहे. (वृत्तसंस्था)एनएसजीला केला होता विरोध भारताच्या एनएसजी (अणु पुरवठादार समूह) सदस्यत्वाला विरोध करण्यात चीनच अग्रेसर होता, हे विशेष. चीनने खोडा घातल्यामुळेच भारताचे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अर्थात, भारताला विरोध करताना चीनची पाकिस्तानशी असलेली जवळीक कधी लपून राहिली नाही. कारण, पाकच्या काही अतिरेक्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघात प्रयत्न केले तेव्हाही चीननेच खोडा घातला होता. अलिकडच्या काळात भारताबाबत चीनची भूमिका नकारात्मकच राहिली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता दहशतवादाविरुद्ध भारतासह सहकार्य करण्याची चीनची भूमिका सकारात्मक मानली जाते.