शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 02:54 IST

आण्विक इंधन पुरवठादार गटात अर्थात एनएसजीमध्ये प्रवेशासाठी भारताला जी सवलत देण्यात येईल तीच पाकिस्तानलाही दिली जावी, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे.

बीजिंग : आण्विक इंधन पुरवठादार गटात अर्थात एनएसजीमध्ये प्रवेशासाठी भारताला जी सवलत देण्यात येईल तीच पाकिस्तानलाही दिली जावी, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे.अण्वस्त्र प्रसारबंदी करार आणि एनएसजी भारताला सवलत देत असतील, तर ही सवलत पाकलाही मिळायला हवी, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने पाकला एनएसजीत प्रवेश देण्याला उघड पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ असावी. ‘भारताच्या एनएसजी प्रवेशात चीनचा अडथळा नाही,’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या लेखात म्हटले आहे की, भारताला प्रवेश देऊन पाकला बाहेर ठेवण्यास चीनसह इतर देशांचा विरोध आहे. कारण आम्हाला भारताच्या समस्येचे निराकारण करण्याच्या बदल्यात दुसरी मोठी समस्या निर्माण करायची नाही. भारत व पाकने १९९८ मध्ये अणुचाचणी केली होती आणि आंतरराष्ट्रीय मंचावरून याचा अमेरिका, युरोपियन संघ आणि जपानने दोन्ही देशांवर कडक निर्बंध घातले होते. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर हे निर्बंध हटविण्यात आले. अमेरिकेने आता भारतासोबत नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली असून, तो भारताच्या एनएसजी प्रवेशाला पाठिंबा देत आहे. मात्र भारताच्या आण्विक दर्जाच्या वैधतेचा मुद्दा अद्याप सोडविण्यात आलेला नाही, असेही या लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)वॉशिंग्टन : अमेरिकेने एनएसजी सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या मोहिमेला पाठबळ देत या गटाच्या सदस्य देशांना भारताच्या प्रवेशाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले की, भारत एनएसजीच्या सदस्यत्वासाठी तयार असून, एनएसजी सदस्यांनी सेऊल येथे सध्या सुरू असलेल्या बैठकीत त्याच्या प्रवेशाचे समर्थन करावे, असे आम्हाला वाटते.