शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

निश्चित धोरण असेल तर भ्रष्टाचाराला रोखणे शक्य!

By admin | Updated: March 12, 2015 23:38 IST

सरकार निश्चित धोरणानुसार काम करणारे असेल तर भ्रष्टाचार रोखता येतो हे नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावातून दिसले आहे,

पोर्ट लुईस : सरकार निश्चित धोरणानुसार काम करणारे असेल तर भ्रष्टाचार रोखता येतो हे नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावातून दिसले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अवघ्या २० कोळसा खाणींच्या लिलावातून दोन लाख कोटींपेक्षाही जास्त महसूल मिळाला असून आमच्या सरकारचा भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार असल्याचे मोदी यांनी सांगितले.मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसमध्ये गुरुवारी मोदी यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देताना ते बोलत होते. दरम्यान, मोदी मॉरीशसच्या स्वातंत्र्यदिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले,‘‘या खाणी मनमानी पद्धतीने वाटण्यात आल्या होत्या व ते वाटप शेवटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. २०४ पैकी केवळ २० कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला व त्यातून आम्हाला २ लाख कोटींपेक्षाही जास्त महसूल मिळाला. आम्ही जर देशाचा कारभार धोरणांनुसार करू, कार्यक्षमतेने काम करू, तर भ्रष्टाचारी व्यवस्थेतून सुटका करून घेता येते.’’ भारताच्या धोरणात भारतीय महासागराला सर्वोच्च प्राधान्य असून ही वेळ संघटित होण्याची आहे, असे ते म्हणाले. या विभागात जगातील अन्य देशांचे स्पष्ट हितसंबंध आहेत, असे मोदी यांनी चीनचा थेट उल्लेख न करता म्हटले. भारतीय महासागर विभागात चीन आपले हितसंबंध जपण्यासाठी पावले टाकण्याची पार्श्वभूमी मोदी यांच्या या विधानाला होती. भारतीय महासागरात जोरदार संघटन करण्याची ही वेळ आहे व येत्या काळात आम्ही पूर्ण शक्तीने ते करू, असे मोदी म्हणाले. मॉरिशससाठी भारताने बनविलेल्या किनारा रक्षक जहाजाचे जलावतरण त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले,‘‘या भागात राहणाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी ही शांतता, स्थैर्य व समृद्धीने जगण्याची आहे; परंतु जगातील इतर देशांचे या भागात फार मोठे हितसंबंध आहेत.’’ १३०० टन वजनाचे हे जहाज आहे. हिंदीला समृद्ध बनविल्याबद्दल प्रशंसा हिंदी साहित्य समृद्ध बनविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मॉरिशसची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)