शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

भारतीय उपखंड युरेशियात उच्चांकी वेगाने कसा घुसला?

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला.

हिमालय निर्मितीची चित्रकथा : संशोधनातून उकलले गुढ रहस्य; दोन प्रवाहांनी खेचले भारताला उत्तरेकडेवॉशिंग्टन : ८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला. त्यावेळी दुहेरी प्रतल घर्षणामुळे ही घटना घडली असे अमेरिकेच्या एमआयटी (मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संस्थेत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. खंड एकमेकाकडे सरकण्याच्या प्रक्रियेत भारताने हा गूढ उच्चांक गाठला आहे. १४० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत हा सुपरखंडाचा एक भाग होता. गोंडवन या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्रदेशाने संपूर्ण दक्षिण गोलार्ध व्यापला होता. १२० दशलक्ष वर्षांपूर्वी आता ज्याला आपण भारत म्हणतो तो भूभाग तुटला व उत्तरेकडे दरवर्षी ५ सें. मी. या गतीने सरकू लागला. ८० दशलक्ष वर्षांपूर्वी या सरकण्याचा वेग वाढला व दरवर्षी १५ सें.मी. गतीने हा भाग उत्तरेकडे सरकू लागला. हा वेग प्रतल सरकण्याचा अत्युच्च वेग मानला जातो. ५० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत युरेशिया यांची टक्कर झाली व त्यातून हिमालयाचा जन्म झाला. भारत युरेशियाकडे जलद गतीने कसा सरकला असेल याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न संशोधक करत होते. त्याचे उत्तर एमआयटी संस्थेतील भूगर्भतज्ज्ञांना मिळाले असून, त्यानुसार भारताला उत्तरेकडे खेचणारे दोन प्रवाह होते. पृथ्वीवरील प्रतलापैकी एक प्रतल दुसऱ्या प्रतलात घुसतो हा त्यातील एक प्रवाह आहे. एक प्रतल आकुंचित झाल्यामुळे तो आजूबाजूचे सर्व वस्तुमान ओढून घेतो. त्यामुळे दोन प्रतल असे आकुंचित झाल्यास खेचले जाण्याचा वेग वाढतो. (वृत्तसंस्था)लक्षावधी वर्षांपूर्वी घडलेल्या या नैसर्गिक उत्पाताची उकल नेपाळला बसलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानंतर झाली आहे. संशोधन करणाऱ्या एमआयटीच्या पथकाला हिमालयाच्या परिसरात अवश्ोष सापडले असून, ते या प्राचीन काळातील उत्पाताचे साक्षीदार असावेत असे मानले जात आहे.नेपाळ भूकंपानंतर झाली उकलया निष्कर्षाला आल्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रतल खेचण्याच्या या संकल्पनेचे एक मॉडेल बनवले. त्यातील भारताच्या प्रतलाने उच्चांकी वेग कसा गाठला असेल याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानुसार ज्यावेळी ही खेचाखेच झाली त्यावेळी भारतीय प्रतलावर दोन घटकांचा दबाव होता. आकुंचित होणाऱ्या दोन प्रतलांची रुंदी व त्यांच्यातील अंतर! हे दोन प्रतल कमी रुंद असून व एकमेकांपासून जास्त अंतरावर असतील, तर भारतीय प्रतल जास्त वेगाने खेचला गेला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.