शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदू विवाह’ पाकमध्ये मंजूर

By admin | Updated: February 19, 2017 02:15 IST

अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाच्या नियमनाशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयक पाकिस्तानच्या सिनेटने शनिवारी मतैक्याने संमत केले. यामुळे पाकमधील हिंदूंना मोठा दिलासा

इस्लामाबाद : अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाच्या नियमनाशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयक पाकिस्तानच्या सिनेटने शनिवारी मतैक्याने संमत केले. यामुळे पाकमधील हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे. हिंदू विवाह विधेयक २०१७ शुक्रवारी सिनेटमध्ये संमत करण्यात आले. आता राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. हा हिंदू समुदायाचा पहिला तपशीलवार वैयक्तिक कायदा आहे. पाकच्या कनिष्ठ सभागृहात (नॅशनल असेम्ब्ली) हे विधेयक १५ सप्टेंबर २०१५ रोजीच संमत झाले असून, कायद्याचे रूप धारण करण्यासाठी केवळ राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. हे विधेयक विवाह, विवाहाची नोंदणी, घटस्फोट आणि पुनर्विवाहाशी संबंधित असल्यामुळे पाकमधील हिंदूंना हे स्वीकारार्ह आहे, असे ‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे. या विधेयकात मुलगा आणि मुलीच्या विवाहासाठी किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कायद्यामुळे हिंदू महिला आता आपल्या विवाहाचा कागदोपत्री पुरावा प्राप्त करू शकतील. पाकिस्तानी हिंदूंसाठी हा पहिला वैयक्तिक कायदा असेल जो पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात लागू होईल. सिंध प्रांताने आधीच आपले हिंदू विवाह विधेयक तयार केले आहे. हे विधेयक विधिमंत्री जाहीद हमीद यांनी सिनेटमध्ये मांडले. त्याला कोणीही विरोध केला नाही. सिनेट फंक्शनल कमिटी आॅन ह्युमन राईटस्ने २ जानेवारी रोजी मोठ्या बहुमताने हे विधेयक संमत केले होते. तथापि, जमियत उलेमा- ए- इस्लाम- फजलचे सिनेटर मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी अशा गरजा पूर्ण करण्यासाठी घटना पुरेशी आहे, असे सांगून या विधेयकाला विरोध केला. (वृत्तसंस्था)हा कायदा बळजबरीचे धर्मांतर हाणून पाडेलविधेयक संमत करताना समितीच्या अध्यक्ष आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटच्या सिनेट सदस्य नसरीन जलील म्हणाल्या की, पाकच्या हिंदूंसाठी वैयक्तिक कायदा तयार करू शकलो नाही, हे अयोग्य आहे. हे केवळ इस्लामच्या सिद्धांतांविरुद्धच नाही, तर मानवाधिकारांचेही उल्लंघन आहे. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे हिंदू खासदार रमेश कुमार वंकवानी देशात हिंदू विवाह कायदा आणण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. खासदारांचे आभार मानताना हा कायदा बळजबरीचे धर्मांतर हाणून पाडेल. आपण विवाहित आहोत हे सिद्ध करणे हिंदू विवाहितेला कठीण असते. ही बाब बळजबरीने धर्मांतरण करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत होती, असे ते म्हणाले.