शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनात सापडला काजव्यासारखा चमकणारा बेडूक

By admin | Updated: March 15, 2017 15:02 IST

अर्जेटिनात काळोखात काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक आढळून आला आहे.

ऑनलाइन लोकमत वॉशिंग्टन, दि. 15 - अर्जेटिनात काळोखात काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक आढळून आला आहे. या बेडकाची प्रजाती दक्षिणी अर्जेंटिनामध्ये सापडली आहे. या बेडकावर हिरवा, पिवळा व तांबडा रंग असून, तो काळोखात रंग बदलत असल्याचं समोर आलं आहे. तसेच हा बेडूक अंधारात निळा किंवा हिरवा प्रकाश बाहेर टाकतो, असं संशोधकांनी शोधून काढलं आहे. कमी तरंगलहरीचा प्रकाश शोषून घेऊन जास्त तरंगलहरींचा प्रकाश बाहेर फेकण्याचा गुणधर्म या बेडकामध्ये आहे. आतापर्यंत उभयचर प्राण्यांमध्ये असा गुणधर्म आढळून आला नव्हता. संशोधकांनी साऊथ अमेरिकन पोल्का डॉट ट्री या जातीचा बेडूक शोधला आहे. हा बेडूक लहरींचा वापर करत असतो, पण लहरी इतर प्राण्यांच्या लहरींपेक्षा वेगळे असतात. महासागरातील अनेक प्राण्यांकडे अशा प्रकारच्या लहरी असतात; त्यात प्रवाळ, मासे, शार्क व हॉकबील कासव (एरेटोमोचेलीस इंब्रिकाटा) यांचा समावेश आहे. प्राण्यांमध्ये हा गुणधर्म कोठून येतो, याचा अद्यापही शोध लागलेला नाही. संदेश पाठवणे, रंग बदलून स्वसंरक्षण करणे, जोडीदाराला आकर्षित करणे हे त्याचे हेतू असू शकतात. या प्रजातीच्या बेडकामध्ये लाल रंगाचा प्रकाश दिसू शकतो. पोलका डॉट फ्री हा बेडूक वेगळा असून तो निळा-हिरवा प्रकाश बाहेर टाकतो. अर्जेंटिना येथे पोलका डॉट ट्री बेडूक सापडले असून, ते हिरवा व निळा प्रकाश बाहेर टाकतात. हायलॉइन एल 1 , हायलॉइन एल 2, हायलॉइन जी 1 रेणू त्यांच्या लसिका पेशी, त्वचा व इतर ठिकाणी असतात, त्यामुळे ते हिरवा प्रकाश बाहेर टाकतात. त्यांच्यात अगदी वेगळ्या प्रकारची हायड्रोकार्बन श्रृंखला असतात आणि ती इतर कुठल्याही प्राण्यात आढळून येत नाही. चंद्राप्रमाणे 18 टक्के दृश्य प्रकाश लहरी हा बेडूक बाहेर टाकतो. या बेडकांच्या प्रजातीला त्यांचा स्वत:चा प्रकाश दिसतो की नाही याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे, असं संशोधन जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अ‍ॅकडमी ऑफ सायन्सेस केलं आहे.