शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मृत्यूपुर्वी वडिलांनी लग्न लावून पाळलं वचन

By admin | Updated: March 26, 2016 15:48 IST

डॉक्टरांनी अँडी बरनार्डला त्याची मुलगी पॉपीला ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगितलं. अँडी बरनार्डला हे ऐकून धक्काच बसला कारण तिच्याकडे फक्त काहीच दिवस बाकी होते

ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. २६ - अँडी बरनार्ड याच्या पत्नीने जेव्हा एका सुंदर मुलीला जन्म दिला तेव्हाच अँडी बरनार्डने आपल्या मुलीला थाटामाटत विवाह करणार असं वचन दिलं होतं. सर्व काही ठिक चालू असताना एक दिवस डॉक्टरांनी अँडी बरनार्डला त्याची मुलगी पॉपीला ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगितलं. अँडी बरनार्डला हे ऐकून धक्काच बसला कारण तिच्याकडे फक्त काहीच दिवस बाकी होते. या आजारावर काहीच उपचार होणं शक्य नव्हत. 
 
जेव्हा ही गोष्ट अँडी बरनार्डच्या मित्रांना कळली तेव्हा त्यांनी आपल्या मित्राचं वचन पुर्ण करण्याचं ठरवलं. त्यांनी पॉपीचा लग्नसोहळा आयोजित केला. पॉपीसाठी फुगे आणि रिबीन लावून सजावटदेखील करण्यात आली. पॉपीलादेखील तिच्या आईने सजवलं आणि लग्नासाठी तयार केलं. हे सगळं काय चालू आहे ? आणि का चालू आहे ? माहित नसणा-या ही चिमुरडी पॉपी नंतर आपल्या वडिलांच्या खांद्यावर झोपी गेली. 
'जेव्हा मला कळलं होतं मला मुलगी झाली तेव्हाच मी एक दिवस तिचा थाटामाटात विवाह करण्याचं ठरवलं होतं. हे असं होईल कधीच वाटलं नव्हतं. आम्हाला अश्रू अनावर झाले आहेत मात्र तरीही मला माझं वचन पाळायचं आहे. तिचं लग्न असं करायच ठरवलं नव्हत पण तिला तो क्षण जगायला दिला आहे', असं सांगताना अँडी बरनार्ड भावूक झाले होते. 
 
'पॉपीला आजारी वाटत असल्याने डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरांनी साधा आजार असल्याची शक्यता सांगितली होती. मात्र तिच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती म्हणून आम्ही दुस-या डॉक्टरांकडे गेलो. पॉपीला उलट्या होत असल्याने तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी किडनी कॅन्सर असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तपासणी केल्यावर तिला ब्रेन ट्यूमर असल्याचं लक्षात आलं ज्यावर काहीच उपचार करु शकत नाही. तिच्याकडे फक्त दोनच दिवस बाकी आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं. ती आमची एकुलती एक मुलगी असल्याने आम्ही नेहमी तिच्या लग्नाबद्दल बोलायचो. पण आपल्या नशिबात काय लिहिलं आहे कोणालाच माहित नसतं', असं सांगताना पॉपीची आई सॅमीला अश्रू अनावर झाले होते.