शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाळ जन्माला घाला अन् भरघोस बक्षीस मिळवा !

By admin | Updated: May 26, 2015 01:38 IST

फिनलँडमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत असून, लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकारने विविध उपाय योजणे सुरू केले आहे.

लेस्टीजार्वी : फिनलँडमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत असून, लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकारने विविध उपाय योजणे सुरू केले आहे. या देशातील छोट्या गावात मूल जन्माला घालणाऱ्या मातापित्यांना बोनस दिला जात आहे, तर काही नगरपरिषदा नव्या पालकांना १ युरोला (१.७० डॉलर) जमिनीचा छोटा तुकडा देत आहेत. लोकसंख्या कमी होण्याचे अनेक परिणाम फिनलंडमध्ये जाणवू लागले आहेत. फिनलंडमधील लोक इतर देशात स्थलांतरित होत असल्यानेही लोकसंख्येला गळती लागली आहे. दोन तृतीयांश छोट्या नगर परिषदा अगदी कमी किमतीला भूखंड देत आहेत. काही न. प. नव्या पालकांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव देत आहेत. रोख रक्कम वा बोनसची रक्कम वेगवेगळ्या गावात वेगवेगळी आहे. पश्चिम फिनलंडमधील एका छोट्या गावाने तर गावात बाळ जन्माला घालणाऱ्या पालकांना १० हजार युरो (११ हजार ४०० डॉलर) देण्याची घोषणा केली आहे. ८१५ लोकसंख्या असणारे लेस्टीजार्वी या गावाची प्रसिद्धी देशातील सर्वात छोटी नगर परिषद अशी आहे. या नगर परिषदेने बाहेरचे लोक गावात येऊन बक्षीसाचा फायदा घेऊ नयेत म्हणून १० हजार युरोपैकी एकावेळी १ हजार युरो देण्याचे जाहीर केले आहे.फिनलंड सरकार आधीच १७ वर्षाखालील मुलांना प्रत्येक मुलासाठी वेगळा भत्ता देते. हा बोनस वा भूखंड यांच्या लोभाने लोकसंख्या वाढली आहे काय? उताजर्वी या २९०१ लोकसंख्या असणाऱ्या गावात नगर परिषद गेली १० वर्षे एक युरोला भूखंड देण्याची योजना राबवत आहे, पण आतापर्यंत काही डझन भूखंड विकले गेले आहेत. ४मलेशियातही जन्मदर घसरू लागला असून, तो सुधारण्यासाठी लोकांनी अधिक मुले जन्माला घालावीत, असे आवाहन सरकार करत आहे. येत्या ५ वर्षांत मलेशियाची गणना विकसित राष्ट्र म्हणून होणार असून, तसे झाल्यानंतर देशाची लोकसंख्या घसरू लागेल. त्याला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जास्त मुले जन्माला घालावीत असे आवाहन करण्यात येत आहे. ४महिला व बालकल्याणमंत्री रोहानी अब्दुल करीर यांच्या म्हणण्यानुसार २०२० पर्यंत मलेशियाचा जन्मदर १.९ पर्यंत घसरेल असा संयुक्त राष्ट्राचा अंदाज आहे. २०१२ साली मलेशियाचा जन्मदर २.१ होता. ४जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; पण त्याचबरोबर देशाच्या दीर्घकालीन फायद्यासाठी अधिक मुले जन्माला घालावीत, असे आवाहन केले.