शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चीन व पाकिस्तानची मैत्री अभेदय : कियांग

By admin | Updated: September 23, 2016 01:33 IST

चीन आणि पाकिस्तान यांनी एकमेकांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला असून, उभयतांची मैत्री अभेद्य आहे, असे चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटल्याचे वृत्त चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ दिले.

न्यूयॉर्क : चीन आणि पाकिस्तान यांनी एकमेकांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला असून, उभयतांची मैत्री अभेद्य आहे, असे चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी म्हटल्याचे वृत्त चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ दिले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनिमित्त ली कियांग व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली, त्या वेळी त्यांनी वरील भाष्य केले.शिन्हुआने दिलेल्या वृत्तात काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा चुकूनही उल्लेख नव्हता हे विशेष. चीन व पाकिस्तानची मैत्री ही व्यूहरचनात्मक व नेहमीच अभेद्य राहिलेली आहे. चीन नेहमीच पाकिस्तानला सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे आणि दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंधांना नवी प्रेरणा मिळण्यासाठी संयुक्त प्रयत्न करायला तयार आहे, असे कियांग म्हणाले. व्यावहारिक सहकार्यामध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर (सीपीईसी) भर आहे व त्यामुळे सकारात्मक प्रगती झाली आहे. कॉरिडॉरची उभारणी ही दोन्ही देशांनी नियोजनबद्धरीत्या करावी, ग्वॉदर बंदराचे काम वेगाने करावे आणि औद्योगिक पट्ट्यात आणखी कंपन्या आणाव्यात, असे कियांग म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)