पॅरिस : इस्लामिक स्टेट वा इसिसने रविवारी प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत अमेरिकन नागरिक पीटर कासिग याच्याबरोबर १८ सिरियन सैनिकांचाही शिरच्छेद केल्याचे दाखविण्यात आले होते. या १८ जणांत एक फ्रेंच नागरिक असल्याचे आता सूत्रांचे म्हणणे आहे. या चित्रफितीत फ्रेंच नागरिक असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओलंदे यांनीही म्हटले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अबू ओथमन असे असून तो वाल दे मार्ने येथील रहिवासी आहे. याआधी आणखी एका फ्रेंच नागरिकाची हत्या इसिसने केली असून, त्याचे नाव मॅक्झिम हुचार्ड (२२) असे असून तो नॉर्मंडी येथील रहिवासी होता. (वृत्तसंस्था)
इसिसकडून फ्रान्स नागरिकाची हत्या
By admin | Updated: November 20, 2014 02:08 IST