शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

स्वीत्झर्लंडमध्ये वैयक्तिक वादातून चार जणांची हत्या

By admin | Updated: May 10, 2015 23:19 IST

स्वीत्झर्लंडमध्ये शनिवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्याने आपला सासरा, सासू आणि मेहुण्यासह चार जणांना गोळ्या घालून ठार मारले व आत्महत्या केली.

जिनिव्हा : स्वीत्झर्लंडमध्ये शनिवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्याने आपला सासरा, सासू आणि मेहुण्यासह चार जणांना गोळ्या घालून ठार मारले व आत्महत्या केली. ही माहिती पोलिसांनी रविवारी दिली.झुरीचच्या उत्तर-पश्चिमेला साधारण ३० किलोमीटरवरील साडेचार हजार लोकवस्तीच्या वुरेंलिंजेन (कँटोन आॅफ आरगाऊ) नावाच्या खेड्यात हे हत्याकांड घडले. हे खेडे जर्मन भाषिक आहे. हे हत्याकांड हा दहशतवादाचा प्रकार असल्याचे म्हणता येणार नाही, असे कँटोन आॅफ आरगाऊचे पोलीस प्रमुख मायकेल लिवुपोल्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, या हत्याकांडाला वैयक्तिक संघर्षाचे कारण आहे. हल्लेखोराकडे बंदुकीचा परवाना नव्हता व त्याने पोलिसाच्या शस्त्रातून गोळीबार केलेला नाही. त्याला तीन मुले आहेत, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले.हल्लेखोराचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. हल्लेखोर सुरुवातीला वसाहतीत गेला व त्याने सासरा (५८), सासू (५७) व मेहुणा (३२) यांना गोळ्या घालून ठार मारले व नंतर त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आणखी एका घरात जाऊन ४६ वर्षांच्या व्यक्तीला ठार मारले.२००७ मध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये स्वीत्झर्लंडमध्ये दर १०० माणसांमागे ४५.७ लोकांकडे बंदूक आहे. ताज्या हत्याकांडानंतर तेथे पुन्हा शस्त्रास्त्र संस्कृतीवर चर्चा सुरू झाली आहे.