काबूल : येथे रविवारी तालिबानने नाटोच्या एका ताफ्यावर हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार अद्याप जीवित हानीचे वृत्त नाही.तालिबानने सरकारी आणि विदेशी ठिकाणांवर हल्ले वाढविले आहेत. विशेषत: तालिबानने उत्तर भागातील एका शहरावर ताबा मिळविल्यानंतर हल्ले वाढविले आहेत. प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले की, हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट दिसत होते. एका छायाचित्रकाराने सांगितले की, सुरक्षा अधिकाऱ्यांनी या भागाला घेराव घातला आहे. घटनास्थळी अॅम्बुलन्स पोहोचल्या आहेत. बॉम्बस्फोटांमुळे घटनास्थळी माती, विटांचा ढिगारा पडला आहे. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.काबूलचे पोलीस विभागाचे प्रवक्ते इबादुल्लाह करिमी यांनी सांगितले की, काबूल शहराच्या जॉयशीर भागात हा हल्ला झाला. एका आत्मघातकी हल्लेखोराने हा हल्ला केला. (वृत्तसंस्था)
काबूलमध्ये विदेशी सैनिकांवर हल्ला
By admin | Updated: October 11, 2015 23:31 IST