शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल चाहत्यांचा पोलिसांशी संघर्ष; इजिप्तमध्ये ३० ठार

By admin | Updated: February 9, 2015 23:38 IST

इजिप्तमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉल चाहते व पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ३० चाहते ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत

कैरो : इजिप्तमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉल चाहते व पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ३० चाहते ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. फुटबॉल सामना सुरू होण्याआधी लोक क्रीडांगणात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न करीत होते. फुटबॉल अत्यंत प्रिय असणाऱ्या या देशातील हा खेळाशी संबंधित सर्वांत वाईट असा हिंसाचार आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार कैरो शहरातील एअर डिफेन्स या स्टेडियममध्ये इजिप्त प्रीमिअर लीग क्लोबचा झामालेक व ईएनपीपीआय यांचा सामना सुरू होण्याआधी ही घटना घडली. चकमक सुरू होताच पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली. व्हाईट नाईट फॅन ग्रुपचे सदस्य क्रीडांगणाबाहेर दंगल करीत होते. झामालेकचे चाहते व्हाईट नाईटस् म्हणून ओळखले जातात. त्यांनी तिकिटे न घेता क्रीडांगणात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधूर सोडल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन, गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी होऊन ३० जण मरण पावले. (वृत्तसंस्था)