शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘फेडरल रिझर्व्ह’चे व्याजदर ‘जैसे थे’

By admin | Updated: April 29, 2016 05:36 IST

फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही;

वॉशिंग्टन : फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही; पण हे दर जूनमध्ये वाढविण्याचा आपला पर्याय खुला ठेवला आहे.फेडरल रिझर्व्हच्या संचालक मंडळाची दोनदिवसीय बैठक येथे बुधवारी समाप्त झाली. त्यानंतर बुधवारी बँकेने आपला निर्णय जाहीर केला. अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदी असूनही आपण पतधोरण कठोर करू शकतो, असे संकेत बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात देण्यात आले आहेत.यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची मार्चअखेरीस बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले होते; पण आर्थिक विकासाचा वेग अजूनही मंद आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.बँकेने म्हटले आहे की, महागाईवर त्याचप्रमाणे जागतिक आर्थिक घडामोडींवर बँकेची बारीक नजर आहे.जगभर असलेल्या आर्थिक अडचणींचाही विचार केला जात आहे. त्यामुळेच व्याजदरात तूर्त बदल न करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर अमेरिकी शेअर बाजारात तेजी आली आणि डॉलरच्या मूल्यात किरकोळ बदल झाला.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेडरल बँकेने १० वर्षांत प्रथमच व्याजदर वाढविले होते. त्याचवेळी यापुढेही व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. मात्र, यावेळी व्याजदरात वाढ केली नाही. जूनमध्ये मात्र व्याजदर ०.२५ टक्क्यावरून ०.५० टक्काकेले जाण्याची शक्यता आहे. काही विश्लेषकांच्या मते सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढीची शक्यता आहे.