शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांची हकालपट्टी टळणार

By admin | Updated: November 22, 2014 02:42 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसला बाजूस सारत मोठ्या स्थलांतर सुधारणांची घोषणा केली.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसला बाजूस सारत मोठ्या स्थलांतर सुधारणांची घोषणा केली. या सुधारणांमुळे अमेरिकेतील ५० लाख बेकायदा नागरिकांना हकालपट्टीपासून संरक्षण मिळणार आहे, त्यात ४ लाख ५० हजार भारतीय नागरिकही आहेत, तसेच ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीय तंत्रज्ञांनाही दिलासा मिळणार आहे. आज आमची स्थलांतर व्यवस्था मोडकळीस आली आहे, प्रत्येकाला हे माहीत आहे, त्यात सुधारणा व्हाव्यात अशी गेल्या कित्येक दशकातील इच्छा होती; पण त्याबाबत काही फारसे केले गेले नाही. बेकायदेशीर नागरिकांना हा मोफत पास असल्याची टीका विरोधक करीत आहेत, ती ओबामा यांनी फेटाळली असून, यापुढे सीमा सुरक्षा अत्यंत कडक केली जाईल. बेकायदेशीर प्रवेश रोखला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्षांनी लागू केलेली ही सर्वात मोठी स्थलांतर सुधारणा आहे असे बोलले जात आहे. या सुधारणानुसार एलपीआर मिळाल्यानंतर व्हिसाची वाट पाहणाऱ्या कुशल तंत्रज्ञ व त्यांच्या जोडीदारासाठी काम करण्याचे सोपे नियम लागू केले जातील. सध्याच्या नियमानुसार एलपीआर अर्ज मंजूर झाल्यानंतर व्हिसा मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहणाऱ्यांना व्हिसा दिला जाईल, तसेच यापुढे बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांना तात्काळ परत पाठविले जाईल. कुशल स्थलांतरितांना, पदवीधरांना व उद्योजकांना लवकर व सहज व्हिसा मिळेल, असे पाहिले जाईल. या लोकांचे योगदान अर्थव्यवस्थेला मिळेल व देशाला व्यापारी नेते मिळतील, असे ओबामांनी म्हटले आहे; पण देशात आत्ता राहत असलेल्या बेकायदेशीर लोकांची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही उपाय योजू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)