शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'इजिप्त एअर'च्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता केली सर्वांची सुटका

By admin | Updated: March 29, 2016 13:09 IST

इजिप्त एअर विमानाच्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता सर्व प्रवाशांची सुटका केल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कैरो, दि. २९ - इजिप्त एअर विमानाच्या अपहरणकर्त्यांनी 4 परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बर वगळता सर्व प्रवाशांची सुटका केल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. याअगोदर अपहरणकर्त्यांनी लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी दर्शवली होती. विमानात 8 ब्रिटीश आणि 10 अमेरिकन नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरणकर्त्यांनी परदेशी नागरिक आणि क्रू मेम्बरला ओलीस ठेवण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. अपहरणकर्त्यांनी कोणतीही मागणी अजून केलेली नाही. इजिप्त एअरचं अपहरण करणाऱ्याचं नाव इब्राहिम समाहा असं असल्याचं वृत्त इजिप्तच्या सरकारी दूरसंचार वाहिनीनं दिलं आहे.
 
इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण करुन विमानाचं सायप्रस येथील लरनाका विमातळावर लॅडींग करण्यात आलं.  अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या विमानाने सकाळी उड्डाण केले असता अचानक सायप्रस येथील लरनाका विमानतळावर एमर्जन्सी लँडींग करण्याची विनंती केली. अपहरणकर्त्यांनी 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.