शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक संकटात भारताची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:53 IST

राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.

हेरात : राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हेरात प्रांतातील अफगाण-भारत मैत्री धरणाचे पंतप्रधान मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर मोदी बोलत होते. दहशतवाद धुडकावल्याबद्दल अफगाण जनतेची प्रशंसा करून मोदी म्हणाले की, तुमच्यातील दुफळीचा केवळ या राष्ट्रावर बाहेरून वर्चस्व गाजवू पहाणाऱ्यांनाच लाभ होईल. अफगाणिस्तानातील युद्ध राष्ट्र निर्मितीचे नव्हते, तर त्याने येथील एका पिढीचे भविष्य हिसकावून घेतले. शूर अफगाण जनता विध्वंस व मृत्यूच्या दूतांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश देत आहे. दहशतवादाचा पराभव करण्यात अफगाणिस्तानला जेव्हा यश येईल तेव्हा जग अधिक सुरक्षित आणि सुंदर होईल, असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानसोबत उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या सहकार्याचा या युद्धग्रस्त देशाच्या प्रत्येक भागापर्यंत विस्तार केला जाईल व या भागीदारीचा अफगाण समुदायाच्या प्रत्येक भागाला लाभ मिळेल. मोदी गनींच्या उपस्थितीत म्हणाले की, ‘तुमच्या डोळ्यात मी भारताबद्दल अपार प्रेम पाहिले आहे. तुमच्या स्मित हास्यात मी या संबंधांचा आनंद पाहिला आहे. तुमच्या दृढ मिठीत मी आमच्या मैत्रीचा विश्वास अनुभवला आहे. ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीअफगाण-भारत मैत्री धरण इराण सीमेलगतच्या हेरात प्रांतात आहे. चिस्त- ए- शरीफ भागात हरिरूड नदीवरील हे धरण आधी सलमा धरण म्हणून ओळखले जात होते. भारताने तब्बल 1700कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या धरणामुळे ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शिवाय ४२ मेगावॅट वीज निर्मितीही होणार आहे. हे धरण विटा आणि सिमेंटने नाही तर आमच्या मैत्रीचा विश्वास आणि अफगाणी, भारतीयांच्या साहसातून साकार झाले आहे. अफगाण लोक आपले चांगले भवितव्य घडविण्यासाठी खूप उत्सुक असून, ते त्याला पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले. आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी अफगाणची शांतता प्रक्रिया, हेरातमध्ये भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्ला आणि देशाच्या पुनर्उभारणीच्या कामाशी संबंधित मुद्यांना स्पर्श केला. तुमच्या देशात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट व्हावीत, असे ते म्हणाले.