शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

मीडियावाले जनतेचे शत्रू

By admin | Updated: February 19, 2017 02:17 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांवर जोरदार हल्ला चढविला असून, मीडियावाले अमेरिकी जनतेचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप केला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांवर जोरदार हल्ला चढविला असून, मीडियावाले अमेरिकी जनतेचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप केला आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर जोरदार टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा हल्ला चढविला आहे. त्यांनी अमेरिकेतील पाच प्रमुख माध्यम कंपन्यांना लक्ष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्स, एनबीसी न्यूज, एबीसी, सीबीएस, सीएनएन यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्यांची थेट नावे घेऊन ट्रम्प यांनी हल्ला चढविला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘फेक (खोटारडा) न्यूज मीडिया (एनवायटाइम्स, एनबीसी न्यूज, एबीसी, सीबीएस आणि सीएनएन) माझा शत्रू नाही, हा मीडिया अमेरिकी जनतेचा शत्रू आहे.’ (वृत्तसंस्था)ट्रम्प यांचे टिष्ट्वट लगेच व्हायरल - अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून अशा प्रकारे प्रसारमाध्यमांवर कठोर टीका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांचे ट्विट लगेच व्हायरल झाले. - अवघ्या काही तासांत ते २८ हजार वेळा रिट्विट केले गेले. ५३ हजार वेळा फॉरवर्ड केले गेले, तसेच त्याला ८५ हजार लाइक मिळाल्या. - अन्य एका ट्विटमध्ये ट्रम्प यांनी पत्रकार परिषद यशस्वी झाल्याचा दावा केला. फॉक्स न्यूजने एक जनमत चाचणी करून निष्कर्ष जाहीर केले. त्यात मीडियापेक्षा व्हाईट हाऊस अमेरिकी नागरिकांना अधिक विश्वासार्ह वाटत असल्याचे आढळून आले.