शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण

By admin | Updated: July 30, 2015 04:13 IST

अमेरिकेत एका आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे फिलाडेल्फिया येथील मुलांच्या रुग्णालयाने जाहीर केले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेत एका आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे फिलाडेल्फिया येथील मुलांच्या रुग्णालयाने जाहीर केले आहे. बाल्टीमोरचा झियान हार्वे याच्यावर शल्यचिकित्सकांनी १० तास ही शस्त्रक्रिया केली. त्याला संसर्गाचा गंभीर आजार झाल्याने त्याचे दोन्ही हात व पावले कापावी लागली होती व मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करावे लागले होते. इतक्या वेदनानंतरही हसतमुख असणाऱ्या झियानने हाताशिवाय खाणे, लिहिणे व व्हिडिओ गेम्स खेळणेही शिकून घेतले होते. आता आपल्या हाताने फुटबॉल फेकण्याचे स्वप्न तो पाहत आहे. प्लास्टिक सर्जरी व पुनर्रचना करणारे ४० डॉक्टर, इतर कर्मचारी, हाडांची शस्त्रक्रिया करणे, भूल देणे व रेडिओलॉजी या टप्प्यातून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी उपस्थित होते. अशी झाली शस्त्रक्रिया सर्जन (शल्यचिकित्सक) डॉक्टरांनी प्रथम हाडे जोडली. मग रक्तवाहिन्या जोडल्या, एकदा रक्त वाहू लागल्यानंतर स्नायू व नसा जोडण्यात आल्या. संसर्गानंतर झियानच्या मूत्रपिंडाचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे तो प्रत्यार्पण करून घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांच्या यादीत होता. शरीराने अवयव नाकारू नये यासाठी औषधे तो आधीपासून घेतो आहे असे फिलाडेल्फिया रुग्णालयाचे डॉ. बेंजामिन चांग यांनी सांगितले. काही आठवड्यांत घरी झियान हार्वे नवे अवयव शरीराने नाकारू नयेत म्हणून औषधे घेत आहे. त्याच्या बाल्टिमोरमधील घरी तो आणखी काही आठवड्यांनंतर जाऊ शकेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे वर्षानुवर्षे घेतलेल्या प्रशिक्षणाचा, काही महिने केलेल्या नियोजनाचा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या तयारीचा परिपाक होता असे एल स्कॉट लेविन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)