बफेलो, न्यूयॉर्क : अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीला जबरदस्त हिमवादळाचा तडाखा बसला असून, या थंडीने आतापर्यंत आठ बळी घेतले आहेत. न्यूयॉर्कमधील बफेलो राज्याला दुसऱ्या शीतवादळाचा तडाखा बसणार असून, त्यासाठी हे राज्य सज्ज होत आहे. या राज्यातील मृतांचा आकडा ५ आहे. दार उघडताच लोकांना बर्फाच्या भिंती दिसत आहेत. लोक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. बफेलो राज्यात इरी तलावातून थंडगार वारे येत असून, बर्फवर्षाव उच्चांक गाठत आहे. गुरुवारी सायंकाळी या भागाला आणखी एका वादळाचा तडाखा बसणार आहे.या परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य अमेरिकेपासून पूर्व किनारपट्टीपर्यंतचे तापमान आणखी आठवडाभर सरासरीपेक्षा खालीच राहील, असा अंदाज आहे. हिमवादळामुळे संपूर्ण देशाातील जनजीवन कोलमडलेआहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील हिमवादळाचे आठ बळी
By admin | Updated: November 21, 2014 03:04 IST