शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्त एअर विमानाचं अपहरणनाट्य संपलं, अपहरणकर्ता अटकेत

By admin | Updated: March 29, 2016 17:48 IST

इजिप्त एअर विमानाचे अपहरणनाट्य अखेर संपलं असून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ओलीस ठेवलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कैरो, दि. २९ -  इजिप्त एअर विमानाचे अपहरणनाट्य अखेर संपलं असून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ओलीस ठेवलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती इजिप्त एअरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणा-या व्यक्तीने स्फोटकांचा बेल्ट बांधला असून उडवून देण्याची धमकी देत विमानाचं एमर्जन्सी लॅडींग करण्यास सांगितलं होतं. 
 
इजिप्त एअर विमानाचं अपहरण करणारी व्यक्ती इजिप्तची नागरिक असून त्याचं नाव सैफ अल दिन मुस्तफा असल्याचं इजिप्त एअरने स्पष्ट केलं होतं. सुरुवातीला त्याचं नाव  इब्राहिम समाहा असल्याचं सांगण्यात येतं होतं. तसंच हे अपहरण दहशतवाद्यांनी केलं नसल्याचही सायप्रसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं. सुरुवातीला काहीच मागणी न करणा-या अपहरणकर्त्यांने नंतर लरनाकामध्ये राहणा-या आपल्या माजी पत्नीला पत्र पाठवण्याची मागणी केली होती त्यानंतर कारागृहातून आरोपींना सोडून देण्याची मागणी केली होती. 
अपहरणकर्त्यांकडे असलेला बेल्ट खरा आहे की खोटा याचा तपास केला जात आहे. तसंच अपहरण करण्यामागचा नेमका हेतू काय होता ? याचीदेखील तपासणी केली जात आहे. अपहरणाचा त्याच्या पत्नीशी संबंध असल्याची शंका सध्या व्यक्त केली जात आहे. अपहरणकर्चा माथेफिरु असण्याची शक्यचा वर्तवली जात आहे. विमानात 8 ब्रिटीश आणि 10 अमेरिकन नागरिक होते. अपहरणकर्त्यांने केबिन क्रू आणि चार परदेशी नागरिक वगळता सर्व प्रवाशांची सुटका केली होती.
 
अपहरणकर्त्यांने 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली आली होती. विमानात एकूण 55 प्रवासी आणि 7 क्रू मेम्बर्स होते.  विमानात एक अपहरणकर्ता असून तो आत्मघाती हल्लेखोर असल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती, तसंच विमानात बॉम्ब असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत होती.