शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'इजिप्त एअर' विमानाचे अपहरणकर्ते लहान मुलं आणि महिलांना सोडण्यास तयार

By admin | Updated: March 29, 2016 12:46 IST

इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानातून लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी अपहरणकर्त्यांनी दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कैरो, दि. २९ - इजिप्त एअरच्या अपहरण झालेल्या विमानातून लहान मुलं आणि महिलांना सोडून देण्याची तयारी अपहरणकर्त्यांनी दर्शवली आहे. अपहरणकर्त्यांनी 20 लोकांची सुटका केली असल्याची माहितीदेखील मिळाली आहे. तसंच अपहरणकर्त्यांनी वैमानिकाला विमानातून हाकलून दिलं असून विमानाचा ताबा घेतला आहे. नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे अपहरण झालेल्या इजिप्त एअर विमानाच्या वैमानिकला अपहरणकर्त्यांने आत्मघाती स्फोट करण्याची प्रवाशाने धमकी दिली होती. 
 
इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण करुन विमानाचं सायप्रस येथील लरनाका विमातळावर लॅडींग करण्यात आलं.  अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या विमानाने सकाळी उड्डाण केले असता अचानक सायप्रस येथील लरनाका विमानतळावर एमर्जन्सी लँडींग करण्याची विनंती केली. अपहरणकर्त्यांनी 8.30 वाजता कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून विमानाचं लॅडींग करण्यासाठी रनवे मोकळा करण्यास सांगितला, त्यानंतर 8.50 ला विमानाला विमानाचं लॅडींग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विमानात एकूण 55 प्रवासी आणि 7 क्रू मेम्बर्स आहेत. अपहरणकर्त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही मागणी केलेली नाही. बचावकार्य पथकांना एअरपोर्टच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.