शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम आफ्रिकेमध्ये ‘इबोला’ साथीचा कहर, ६७२ बळी; अख्खे जग चिंताक्रांत

By admin | Updated: August 1, 2014 00:45 IST

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत इबोला साथीचा भयावह प्रकोप झाला असून, ६७२ बळीनंतरही साथ आटोक्यात येत नसल्यामुळे अख्खे जग चिंताक्रांत झाले आहे

फ्रीटाउन : पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत इबोला साथीचा भयावह प्रकोप झाला असून, ६७२ बळीनंतरही साथ आटोक्यात येत नसल्यामुळे अख्खे जग चिंताक्रांत झाले आहे. इबोला विषाणूंच्या धुमाकुळाला आळा घालण्यासाठी सिएरा लिओनने सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच जाहीर केली असून, या विषाणूंची बाधा झालेल्या भागांना इतर भागांपासून अलग ठेवण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सिएरा लिओनच्या या उपाययोजना शेजारील लायबेरियाने जाहीर केलेल्या इबोलाविरोधी पॅकेजशी मिळत्याजुळत्या आहेत. इबोला संकटामुळे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्ट बाई कोरोमा यांनी आपला पुढील आठवड्यातील अमेरिका दौरा रद्द केला आहे. अमेरिका-आफ्रिका परिषदेसाठी ते वॉशिंग्टनला जाणार होते.इबोला प्रभावित भागांना इतर भागांपासून वेगळे ठेवण्यात येणार असून पोलीस व सुरक्षा दले ही जबाबदारी सांभाळतील. पुढील ६० ते ९० दिवस या भागातील नागरिकांना इतर ठिकाणी जाण्यास तसेच इतर ठिकाणच्या नागरिकांना या भागात येण्यास मज्जाव केला जाणार आहे. याशिवाय घराघरात जाऊन इबोला रुग्णांचा शोध घेण्यात येणार असून इबोलाचा संसर्ग झालेल्यांना इतरांपासून वेगळे केले जाणार आहे. शांतता सैनिक काढून घेतलेइबोलाच्या प्रकोपामुळे अमेरिकी शांतता सेनेने लायबेरिया, गिनी आणि सिएरा लिओनमधील आपले शेकडो शांतता सैनिक काढून घेतले आहेत. या सैनिकांपैकी दोघे इबोलामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे.शाळा बंदलायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील शाळा बंद करण्याचे तसेच बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सिएरा लिओनलगतच्या सीमा भागातील बाजारपेठाही बंद करण्याचे आदेश जारी केले. ब्रिटनमध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोब्रा क्रायसिस मॅनेजमेंट कमिटीची बैठक घेतली.विमानाद्वारे प्रसाराची शक्यताआंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने या साथीचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपायांवर जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लायबेरियातून नायजेरियात आलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा इबोलामुळे मृत्यू झाला होता. हा कर्मचारी विमानाने नायजेरियात आला होता. त्यामुळे विमान प्रवाशांद्वारे हा आजार इतर देशांत पसरण्याची शक्यता वर्तविली जात असून आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटना याबाबत काही उपाययोजना करण्याच्या तयारीला लागल्याचे समजते. (वृत्तसंस्था)