शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचा पुन्हा हादरा!

By admin | Updated: May 13, 2015 02:21 IST

आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला

काठमांडू/ नवी दिल्ली : आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ७.३ तीव्रतेची नोंद झालेल्या या भूकंपाचे जोरदार धक्के भारताच्या पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांना बसले. या ताज्या भूकंपामुळे नेपाळमध्ये ४२ जण ठार तर १ हजाराहून लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतात या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बिहारला बसला व त्याने १७ जणांचा बळी घेतला. या नव्या भूकंपामुळे नेपाळप्रमाणेच भारतात पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरात व दक्षिणेला चेन्नईपर्यंतच्या पट्ट्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले.दुपारी १२.३५ वाजता आलेल्या मुख्य भूकंपानंतर नेपाळमध्ये भूकंपाचे आणखी सात धक्के जाणवले. त्याने काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या सिंधुपालचौक व ढोलाका या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्राणहानी झाली व मागच्या भूकंपात वाचलेली घरे व इमारतीही जमीनदोस्त झाल्या, असे दिल्लीतील नेपाळी दूतावासाने म्हटले आहे. पूर्व व उत्तर भारतालाही भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर ६.२, ५.४ आणि ४.८ तीव्रतेचे तीन भूकंपपश्चात धक्के बसले. नेपाळमधील या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि चेन्नईतही जाणवले, पण या ठिकाणी कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही. याआधी २५ एप्रिलला आलेल्या भूकंपातही बिहारमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. (वृत्तसंस्था)