शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक कृत्यप्रकरणी विरोधी नेत्याचे दोषत्व मलेशियात कायम

By admin | Updated: February 10, 2015 22:49 IST

मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या २००८ च्या प्रकरणामध्ये विरोधी नेते अन्वर इब्राहीम

क्वालालंपूर : मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या २००८ च्या प्रकरणामध्ये विरोधी नेते अन्वर इब्राहीम यांना दोषी ठरवून त्यांची पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा मंगळवारी कायम ठेवली. या निकालाने माजी उपपंतप्रधानांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. सरन्यायाधीश अरफीन जकारिया यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाने ६७ वर्षीय अन्वर यांना दोषी ठरवत हा निकाल दिला. सहा मुलांचे वडील आणि पाच मुलांचे आजोबा असलेल्या अन्वर यांनी मोहंमद सैफुल या राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचे ठोस पुरावे असल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोप सिद्ध झाले आहेत. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आम्ही कोर्ट आॅफ अपीलच्या निकालाशी सहमत आहोत, असे सरन्यायाधीशांना अन्वर यांचे अंतिम अपील फेटाळताना सांगितले. अन्वर न्यायालयात शांत होते. त्यांनी कुटुंबीय आणि समर्थकांची गळाभेट घेतली. त्यांच्या मुलींसह काहींचे डोळे पाणावले होते. ९ जानेवारी २०१२ रोजी क्वालालंपूर उच्च न्यायालयाने अन्वर यांची सैफुल याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपातून सुटका केली होती. मात्र, त्यानंतर कोर्ट आॅफ अपीलने उच्च न्यायालयाचा हा निकाल फेटाळताना गेल्यावर्षी अन्वर यांना पाच वर्षांचा कारावास सुनावला होता. त्याविरुद्ध अन्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. समलैंगिकतेचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यामुळे इब्राहीम यांची कारकीर्द संपुष्टात येईल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.(वृत्तसंस्था)