शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर ध्रुवाभोवतीच्या बर्फाचे नुकसान आर्टिक हवामानामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:51 IST

उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे.

ओस्लो : उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे आहे. उर्वरित नुकसान हे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे असल्याचे शास्त्रज्ञांनी सोमवारी सांगितले. या अभ्यासातून असे संकेत मिळत आहेत की आर्टिक महासागर हा येत्या काही वर्षांत बर्फमुक्त होण्याची भीती आहे. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगने जो धोका दिसत आहे तो काहीसा पुढे ढकला जाऊ शकतो पण वारे त्यांच्या वातावरण थंड करण्याच्या भूमिका परत वठवणार असतील तरच. आर्टिक हवामानातील नैसर्गिक बदल हे १९७९ पासून सप्टेंबरमध्ये समुद्री बर्फात जी घट झाली तिला ३० ते ५० टक्के जबाबदार असू शकतील, असे अमेरिकास्थित शास्त्रज्ञांच्या तुकडीने नेचर क्लायमेट चेंज या पाक्षिकात लिहिले आहे. समुद्राच्या बर्फात सप्टेंबर २०१२ मध्ये विक्रमी म्हणता येईल अशी घट झाली होती. हा काळ आर्टिकमध्ये उशिराचा उन्हाळ््याच्या काळ असतो. १९७९ मध्ये उपग्रहांद्वारे ज्या नोंदी ठेवल्या गेल्या त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. मार्चच्या मध्यात बर्फ खूपच कमी आहे. २०१६ व २०१५ मध्ये हिवाळा खूपच कमी होता. या अभ्यासाने आर्टिकच्या वातावरणातील नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल यांना वेगवेगळे केले. हा अभ्यास म्हणतो की आर्टिकच्या हवामानात दशकांपासून होणारे बदल हे ट्रॉपिकल पॅसिफिक ओशनमधील बदलांमुळेही असू शकतील. जर हा नैसर्गिक बदल नजीकच्या भविष्यात थांबवला तर आम्हाला गेल्या काही दिवसांत झपाट्याने जो बर्फ वितळत आहे तो थांबवता येईल एवढेच काय समुद्री बर्फ पुन्हा प्राप्त करता येईल, असे या अभ्यासाचे प्रमुख सांता बार्बारा येथील युनिव्हरसिटी आॅफ कॅलिफोर्नियाचे क्विंगहुआ डिंग यांनी म्हटले.