शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘गुलामी’ रस्त्याविरुद्ध पाकव्याप्त काश्मिरच्या अनेक शहरांत निदर्शने

By admin | Updated: May 16, 2017 01:45 IST

व्यापार आणि आर्थिक सहकार्य या मार्गाने दक्षिण आशियात आपले प्राबल्य अधिक बळकट करण्यासाठी चीनने आखलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी

गिलगिट : व्यापार आणि आर्थिक सहकार्य या मार्गाने दक्षिण आशियात आपले प्राबल्य अधिक बळकट करण्यासाठी चीनने आखलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर बीजिंगमध्ये पाकिस्तानसह २३ देशांची परिषद सुरु असतानाच याच योजनेचा एक भाग असलेला ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) जेथून जातो त्या पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्तिस्तानमध्ये चीनच्या या विस्तारवादाविरुद्ध निदर्शने सुरु झाली आहेत. गिलगिट-बाल्तिस्तान हा वादग्रस्त पाकव्याप्त काश्मीरचा भाग असल्याने सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करून भारताने बीजिंग परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.काराकोरम स्टुडन्ट््स आॅर्गनायजेशन, बलवारीस्तान नॅशनल स्टुडन्ट््स आॅर्गनायजेशन, गिलगिट बाल्तिस्तान युनायडेट मूव्हमेंट आणि बलवारीस्तान नॅशनल फ्रंट यासह अनेक विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी गिलगिट, हुन्झा, स्कार्डू आणि गिझेर या शहरांमध्ये निदर्शने केली.‘सीपीईसी’ हा गिलगिट-बाल्तिस्तानच्या दृष्टीने गुलामीचा रस्ता आहे व ‘सीपीईसी’ आणि ‘ओबीओआर’ ही चीनचा गिलगिट बळकावण्याचा कुटील डाव आहे, असा या निदर्शकांचा आरोप आहे. ‘चीनची साम्राज्यशाही रोखा’, असे फलक हाती घेऊन निदर्शक रस्त्यांवर उतरले होते. गिलगिट हा सन १९४८-४९ पासून वादग्रस्त प्रदेश असल्याने या भूमीवरील चीनचे अतिक्रमण जागतिक समुदायाने रोखाने, असे आवाहन ते करीत होते. ‘सीपीईसी’च्या नावाखाली पाकच्या संगनमताने चीनने गिलगिटमध्ये बेकायदा घुसखोरी केली आहे. एकीकडे या निमित्ताने पाकिस्तानात चीनचे लष्करी अस्तित्व टिकवून ठेवणे व दुसरीकडे अमेरिकेला शह देणे, असा दुहेरी हेतू यामागे असल्याचा आरोप या निदर्शकांनी केला.