शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इसिसला संपवण्याचा निर्धार!

By admin | Updated: November 22, 2015 04:19 IST

इसिस’ आणि अन्य अतिरेकी संघटना यांचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत आणि याबाबत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करणारा फ्रान्सचा

कारवाईला सुरक्षा परिषदेची मंजुरी : सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेतसंयुक्त राष्ट्रे : ‘इसिस’ आणि अन्य अतिरेकी संघटना यांचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत आणि याबाबत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करणारा फ्रान्सचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केला आहे. त्यामुळे इसिसच्या विरोधात उभे जग एकवटण्याच्या प्रक्रियेला बळ मिळणार आहे.‘इसिस’ या संघटनेपासून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला एक जागतिक धोका निर्माण झाला आहे. या धोक्याचा सर्व माध्यमांद्वारे मुकाबला करण्यास सुरक्षा परिषद वचनबद्ध आहे, असे ठरावात म्हटले आहे.पॅरिससारखाच हल्ला घडवून आणला जाण्याचे संकेत मिळाल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सला छावणीचे रूप आले असून, राजधानीतील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे; शिवाय सर्व दुकानेही बंद करण्यात आली आहेत. पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जियमचा होता. त्यामुळे बेल्जियममध्ये घातपात होण्याची भीती व्यक्त होत आहे.सिरियात ३६ ठारसीरियात ‘इसिस’चे नियंत्रण असणाऱ्या दीर एजोर प्रांतात रशियन आणि सिरियन जेट विमान बॉम्बहल्ल्यात ३६ जण ठार झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रात निरीक्षकांनी दिली.‘सीरियन आॅब्झर्व्हेटरी फॉर ‘ह्युमन राईट्स’ या संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी ही माहिती देताना सांगितले की, या विभागात लढाई सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वांत भीषण हल्ला होता.गेल्या आठवड्यातच पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० जण ठार आणि ३५० जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.