शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औषधांमुळे महिलांची नैसर्गिक प्रसूती क्षमता धोक्यात

By admin | Updated: May 25, 2015 00:55 IST

प्रसूतीवेदना होत असताना दिल्या जाणाऱ्या औषधांवर गर्भवती महिला जास्त अवलंबून राहत असून, ही औषधे व सिझेरियन शस्त्रक्रिया

लंडन : प्रसूतीवेदना होत असताना दिल्या जाणाऱ्या औषधांवर गर्भवती महिला जास्त अवलंबून राहत असून, ही औषधे व सिझेरियन शस्त्रक्रिया यामुळे महिलांची नैसर्गिक प्रसूतीची क्षमता कमी होत चालली असल्याचा दावा आघाडीच्या डॉक्टरने केला आहे. डॉ. मिचेल ओडंट या फ्रेंच डॉक्टरच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी गरज असणारे हार्मोन गर्भवती महिलांच्या शरीरात तयार होणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण डॉक्टर हे हार्मोन ड्रिपने महिलांना दीर्घकाळ देतात. नैसर्गिकरीत्या प्रसूतीचे हार्मोन तयार न झाल्यामुळे महिलांची स्तनपान देण्याची क्षमताही संपत आहे. डॉ. मिचेल ओडंट यांचे ‘डु वुई नीड मिडवाईव्ह्ज?’ (आपल्याला दायांची गरज आहे काय?’) हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असून, त्यात ते म्हणतात, महिलांची नैसर्गिकरीत्या मूल जन्माला घालण्याची क्षमता संपत आहे. नैसर्गिकरीत्या प्रसुतींची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. नैसर्गिक प्रसूतीची संख्या कमी होण्यामागे आॅक्सिटोसिन या हार्मोनची कमतरता हे मोठे कारण आहे. आॅक्सिटोसिन हे हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करून ते महिलांना दिले जात असल्याने नैसर्गिकरीत्या आॅक्सिटोसिन तयार होतच नाही. प्रसूतीवेदना होण्यासाठी आॅक्सिटोसिन हार्मोन लागते, याच हार्मोनमुळे महिलांना आपल्या मुलाबद्दल प्रेम वाटू लागते. आई व मूल यांच्यात अतूट प्रेमाचा बंध निर्माण होतो व मुलाला स्तनपान देण्यासाठीही हेच हार्मोन प्रेरित करते, पण सिझेरियन शस्त्रक्रियामुळे बहुतांश महिलांना ड्रीपद्वारे हे हार्मोन दिले जाते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या हे हार्मोन स्रवण्याची क्षमता धोक्यात आली आहे. (वृत्तसंस्था)