शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

CoronaVirus News: 'हे' एक छोटंसं काम कराल, तर कमी होईल कोरोनाचा धोका; संशोधनातून दावा

By कुणाल गवाणकर | Updated: October 21, 2020 07:57 IST

CoronaVirus News: अमेरिकेतल्या पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांचा अहवाल

वॉशिंग्टन: जगातील कोरोना बाधितांचा आकडा ४ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या सव्वा अकरा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचं, मास्क वापरण्याचं आणि वारंवार हात धुण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावरही भर दिला जात आहे. त्यातच आता काही माऊथवॉशमुळे कोरोना निष्क्रिय होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.माऊथवॉशमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकत असल्याची माहिती मेडिकल वायरॉलॉजीशी संबंधित मासिकात प्रसिद्ध झाली आहे. माऊथवॉशमधील काही घटक कोरोना विषाणूचं प्रमाण कमी करण्यास उपयोगी ठरू शकत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी अमेरिकेतल्या पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी माऊथवॉश आणि नेजोफेरिंजियल रिंजची तपासणी केली.अनेक माऊथवॉशमध्ये कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचं पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलं. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीनं माऊथवॉशचा वापर केल्यास त्याच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो, असंदेखील संशोधन सांगतं. जोपर्यंत आपल्याला कोरोनावरील लस मिळत नाही, तोपर्यंत आपण कोरोनाचा प्रसार रोखण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं, असं पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर क्रेग मेयर्स यांनी म्हटलं. आम्ही परिक्षण केलेली उत्पादनं अतिशय सहजपणे उपलब्ध आहेत आणि लोक दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करू शकतात, असं मेयर्स यांनी सांगितलं.हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती- संशोधन कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहे. वायू प्रदूषण आणि धुक्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढेल. वायू प्रदूषण आणि धुक्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगानं होईल, असं संशोधन सांगतं. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपातल्या काही देशांमध्ये हिवाळ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या