शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचा भारतावर हल्ला करण्याचा कट

By admin | Updated: July 29, 2015 16:58 IST

क्रूरकृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) या दहशतवादी संघटनेने आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. २९ - क्रूरकृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS)  या दहशतवादी संघटनेने आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. 
अमेरिकेतील एका वृत्तपत्रानुसार तालिबानशी संबंधीत एका पाकिस्तानी नागरिकाकडून उर्दु भाषेतील ३२ पानी फाईल जप्त करणयात आली आहे. या कागदपत्रांमध्ये इसिसने आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील तालिबानी संघटनांनी एकत्र यावे व अल कायदा या संघटनेनेही या युद्धात सहभागी व्हावे असे आवाहन इसिसने केले आहे. इसिसच्या प्रमुखांना जगभरातील मुस्लिमांचे सर्वोच्च नेते म्हणून दर्जा मिळायला हवा असे यात नमूद करण्यात आले आहे. ही सर्वनाशाची लढाई असून अरब जगतातही छोटेछोटे सशस्त्र उठाव व्हायला हवे असा उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेतील सीआयएच्या अधिका-यांनी या कागदपत्रांना दुजोरा दिला असून यातील भाषा, खुणा यावरुन ही माहिती इसिसची असल्याचे स्पष्ट होते असे या अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर संबंधीत वृत्तपत्राला सांगितले. इसिसने भारताविरोधात युद्ध पुकारल्यास दक्षिण आशियातील शांततेला धोका निर्माण होईल अशी भीतीही या अधिका-यांनी व्यक्त केली.