शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

क्लिंटन यांना क्लीन चिट

By admin | Updated: November 8, 2016 18:49 IST

फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनने (एफबीआय) डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी मोठा दिलासा दिला

वॉशिंग्टन : फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनने (एफबीआय) डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी मोठा दिलासा दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार असताना, एफबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे क्लिंटनसमर्थक खुशीत आहेत.नव्याने हाती लागलेल्या ईमेल्सची तपासणी केली असता क्लिंटन यांच्यावर गुन्हेगारी आरोप ठेवले जाऊ शकत नाहीत, असे एफबीआयने म्हटले. हिलरी क्लिंटन यांच्याबाबत आम्ही गेल्या जुलै महिन्यात जो निष्कर्ष काढला होता त्यात आम्ही आता जो आढावा घेतला आहे. त्यामुळे तो बदलण्याची गरज नाही, असे एफबीआयचे संचालक जेम्स बी कोमी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले. क्लिंटन यांनी त्या परराष्ट्र मंत्री असताना ईमेल्ससाठी खासगी सर्व्हरच्या केलेल्या वापराची चौकशी नुकत्याच सापडलेल्या ईमेल्सनंतर करण्यात आली. हे ईमेल्स सापडल्यानंतर एफबीआयने चौकशी करण्याचे जाहीर केल्यावर क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून क्लिंटन यांच्यावर जोरदार टीका होत होती व क्लिंटन यांच्या लोकप्रियतेमध्येही घट झाली होती. एफबीआयने क्लिंटन यांना दिलासा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर टीका केली व स्वार्थी व्यवस्थेने क्लिंटन यांना पाठिशी घातल्याचा आरोप केला. हिलरी क्लिंटन यांच्या मदतनीस हुमा अबेदिन यांच्यापासून वेगळे राहात असलेले त्यांचे पती व माजी काँग्रेस सदस्य अ‍ॅन्थोनी विनर यांच्या लॅपटॉपवर सापडलेल्या ईमेल्सनंतर एफबीआयने पुन्हा चौकशी सुरू केल्याचे पत्र २८ आॅक्टोबर रोजी कोमी यांनी काँग्रेसला पाठवले होते. माझ्या २८ आॅक्टोबरच्या या पत्रानंतर एफबीआयची तुकडी एवढ्या मोठ्या संख्येतील ईमेल्सचा आढावा अहोरात्र काम करून घेत आहे, असे कोमी म्हणाले. विनर यांच्या लॅपटॉपवर ६,५०,००० ईमेल्स असल्याचे कोमी म्हणाले. (वृत्तसंस्था)डोनाल्ड ट्रॅम्प यांनी प्रसिद्ध अमेरिकन कंपनी आयबीएमने मिनेसोटातील ५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकून त्यांचे रोजगार भारत आणि इतर देशांना दिल्याचा आरोप केला आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांवर ३५ टक्के कर आकारीन, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प प्रशासन अमेरिकेतून बाहेर देशांत जाणारे रोजगार थांबवील, मिनेसोटातील रोजगारही आम्ही थांबवू, असे ट्रम्प मिनेपोलीसमध्ये सभेत रविवारी म्हणाले.अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना, दोन्ही उमेदवार हे इस्लामविरोधी असल्याने त्यांना मतदान करू नये, असे आवाहन इसिस या दहशतवादी संघटनेने केले आहे. मुस्लीम मतदारांनी मतदान करू नये, असेही इसिसने म्हटले आहे. मतदानाच्या आधी अमेरिकेवर हल्ले करण्याची धमकी इसिसने याआधी दिली असून, त्यामुळे सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्क, टेक्सास आणि सिएटल या शहरांतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.