शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णवर्णीय तरुणाची हत्या करणा-या पोलिसाला क्लीन चिट, अमेरिकेत हिंसक आंदोलन

By admin | Updated: November 25, 2014 15:58 IST

अमेरिकेतील फर्गसन येथे १८ वर्षाच्या कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येप्रकरणी ग्रॅंड ज्यूरींनी पोलिस अधिका-याविरोधात खटला चालवण्यास नकार दिल्याने अमेरिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे.

ऑनलाइन लोकमत

फर्गसन, दि. २५ -  अमेरिकेतील फर्गसन येथे १८ वर्षाच्या कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येप्रकरणी ग्रॅंड ज्यूरींनी पोलिस अधिका-याविरोधात खटला चालवण्यास नकार दिल्याने अमेरिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. फर्गसन येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरून पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन करत असून तिथे पुन्हा एकदा दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑगस्टमध्ये फर्गसन येथे १८ वर्षाच्या मायकेल ब्राउन या आफ्रिकी - अमेरिकी तरुणाची डॅरेन विल्सन या श्वेतवर्णीय पोलिस अधिका-याने गोळी झाडून हत्या केली होती. मायकल रस्त्यावरुन जात असताना डॅरेन विल्सनने त्याला हटकले, यानंतर त्यांच्यामध्ये बोलाचालीही झाली. यादरम्यान डॅरेनने मायकेलवर सहा गोळ्या झाडून त्याची हत्या केली. मायकेल हा गुंड असल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र या घटनेदरम्यान मायकल हा नि:शस्त्र होता व त्याने पोलिसांना प्रतिकारही केला नसल्याचे उघड झाल्याने पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वर्णद्वेषातूनच ही हत्या झाल्याची चर्चा फर्गसनमधील सुरु झाली व यानंतर तब्बल महिनाभर फर्गसनमध्ये कृष्णवर्णीयांनी हिंसक आंदोलन केले होते. 

मायकेल ब्राऊनच्या हत्येप्रकरणी नऊ श्वेतवर्णीय व तीन कृष्णवर्णीयांची समिती नेमली होती. या समितीच्या ग्रँड ज्यूरींनी सोमवारी निकाल दिला. यात ग्रँड ज्यूरींनी पोलिस अधिकारी डॅरेन विल्सन यांच्याविरोधात खटला चालवण्यास नकार दिला. समितीने  २५ दिवसांमध्ये ६० साक्षीदारांकडून जबाब घेतला होता. या आधारे ग्रॅँड ज्यूरींनी डॅरेन ब्राउन यांना क्लीन चिट दिली.  'हा निकाल प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे देण्यात आला असून जनमताच्या आधारे दिलेला नाही' असे समितीने स्पष्ट केले. 
डॅरेक विल्सन यांना क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त वा-यासारखे फर्गसनमध्ये पसरले व शहरातील कृष्णवर्णीय समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाने डॅरेक विल्सन ज्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच्याबाहेर आंदोलन केले. यानंतर शहराच्या अन्य भागांमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया या भागांमध्ये या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु झाली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील जनतेने शांतता बाळगावी असे आवाहन केले आहे.