शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ ग्रहावर खेकडा दिसल्याचा दावा

By admin | Updated: August 6, 2015 22:42 IST

मंगळावर पाणी असल्याचे दावे आतापर्यंत अनेकवार करण्यात आले; पण तिथे जीवसृष्टी आहे की नाही याची खात्री अद्याप पटलेली नसताना मंगळावरील खडकावर

वॉशिंग्टन : मंगळावर पाणी असल्याचे दावे आतापर्यंत अनेकवार करण्यात आले; पण तिथे जीवसृष्टी आहे की नाही याची खात्री अद्याप पटलेली नसताना मंगळावरील खडकावर खेकडा आढळल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. एलियन्सचा शोध घेणाऱ्या वेबसाईटवर मंगळावरील खेकड्याची आकृती दिसत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेबसाईटवरील छायाचित्रात मंगळावरील एका विशाल खडकाच्या मध्यभागी खेकड्यासारखी आकृती दिसत आहे. १९८० च्या दशकात अमेरिकेतील एलियन चित्रपटात अशाच प्रकारे परग्रहावरील जीव दाखविण्यात आला होता. वेबसाईटवर टाकलेले हे छायाचित्र नासाच्या मार्स क्युरिआॅसिटी रोव्हर या मंगळावर असणाऱ्या यानाने घेतले आहे. या छायाचित्राची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे; पण ही आकृती खेकड्यासारखी दिसत असली तरीही प्रत्यक्षात तो खडकाचाच एक भाग आहे, असे संशोधकांनी म्हटले असून, तज्ज्ञांची मागणी फेटाळली आहे. मंगळावर पाणी व जीवसृष्टी असल्याचे दावे अनेक वेळा केले जात असून, गेली ४० वर्षे मंगळावर मोहीम राबविली जात आहे. कधी मानवी चेहरा दिसत असल्याचा दावा केला जातो, तर कधी पिरॅमिड आढळल्याचा दावा केला जातो; पण ठोस पुराव्याअभावी हे दावे फोल ठरले आहेत. वॉशिंग्टन : नासाच्या अंतराळातील उपग्रहावर असणाऱ्या कॅमेऱ्याने चंद्राच्या दुसऱ्या बाजूचीही छायाचित्रे घेतली आहेत. १.६ लाख कि. मी. अंतरावरून ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. हे छायाचित्र पृथ्वीवर सूर्यप्रकाश असताना घेण्यात आले असून, त्यात चंद्र पृथ्वीसमोर आहे.चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून, चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा व स्वत:च्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग एकच असल्याने त्याची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.पृथ्वीपासून १.६ लाख कि. मी. अंतरावर फिरणाऱ्या उपग्रहावर द अर्थ पॉलिक्रोमेटिक इमेजिंग कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याचे सूर्यप्रकाशातील पृथ्वीवर कायम लक्ष असते. वर्षातून दोनदा हा कॅमेरा पृथ्वी व चंद्र अशी दोघांचीही छायाचित्रे घेऊ शकतो. कारण उपग्रहाची कक्षा चंद्राच्या कक्षेला पार करून जाते. चंद्राची दुसरी बाजू सर्वप्रथम १९५९ साली सोविएत लुना ३ यानाने पाठविलेल्या पहिल्या छायाचित्रात दिसली होती. त्यानंतर नासाने ही चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे अधिक तपशीलवार मिळवली आहेत. चंद्राची दुसरी बाजू अंधारी आहे.(वृत्तसंस्था)