शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

केरळमधील दोघांना ख्रिस्ती समुदायाचे संतपद

By admin | Updated: November 23, 2014 18:02 IST

केरळमधील फादर कुरियाकोस आणि सिस्टर युफ्रासिया यांना मरणोत्तर संतपदाची उपाधी देण्यात आली आहे. रविवारी व्हॅटिकन सिटीमधील कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी या दोघांनाही संतपद बहाल केले.

ऑनलाइन लोकमत

व्हॅटिकन सिटी, दि. २३ - केरळमधील फादर कुरियाकोस आणि सिस्टर युफ्रासिया यांना मरणोत्तर संतपदाची उपाधी देण्यात आली आहे. रविवारी व्हॅटिकन सिटीमधील कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी या दोघांनाही संतपद बहाल केले असून केरळमधील सिरीयो मलबार चर्चला मिळालेले हे तिसरे संतपद आहे. 
रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स स्क्वेअर येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनासभेत पोप फ्रान्सिस यांनी केरळमधील दोघांना संतपद बहाल केले. फादर कुरियाकोस उर्फ चव्हारा (१८०५ ते १८७१) हे धर्मनिरपेक्ष शिक्षणाचे पुरस्कर्ते होते व त्यांनी केवळ कॅथलिकच नव्हे तर हिंदू दलितांसाठीही काम केल्याचे जाणकार सांगतात. १९८४ मध्ये त्यांना संतपद देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. तर सिस्टर युफ्रासिया यांचा जन्म १८७७ मध्ये त्रिसूर जिल्ह्यात झाला होता. सिस्टर युफ्रासिया यांच्याकडे येणा-या प्रत्येकाला त्या योग्य सल्ला देत व त्यांचे समाधान करत. १९५२ मध्ये सिस्टर युफ्रासिया यांचा मृत्यू झाला. १९८७ मध्ये त्यांना देवाच्या सेवक म्हणून घोषित करण्यात आले होते.  रविवारी या दोघांना संतपद बहाल करण्यात आल्यावर केरळमध्ये उत्साहाचे वातावरण असून केरळमधील विविध ठिकाणी प्रार्थना सभांचे आयोजन केले जात आहे.