शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

केनियात मुस्लिमांच्या मदतीमुळे वाचले ख्रिश्चनांचे प्राण

By admin | Updated: December 24, 2015 12:39 IST

केनियामध्ये एका प्रवासा दरम्यान मुस्लिमांनी ख्रिश्चन नागरीकांचे दहशतवाद्यांपासून प्राण वाचवल्याची चांगली घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मंडेरा, दि. २४ - मागच्या महिन्यात पॅरिसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये मुस्लिमधर्मीयांबद्दल असंतोषाची भावना वाढत असताना, केनियामध्ये एका प्रवासा दरम्यान मुस्लिमांनी ख्रिश्चन नागरीकांचे दहशतवाद्यांपासून प्राण वाचवल्याची चांगली घटना घडली आहे. 

बीबीसीने दिलल्या वृत्तानुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रवाशांनी भरलेली बस मंडेरामधून जात असताना अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी ही बस रोखली. बसमध्ये आल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मीयांची हत्या करण्यासाठी दोन्ही प्रवाशांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण बसमधील मुस्लिमांनी  वेगळे होण्यास नकार दिला. 
सोडायचे  असेल तर सर्वांना सोडा किंवा सर्वांनाच मारा असे दहशतवाद्यांना ठणकावून सांगितले. अखेर त्या दहशतवाद्यांनी सर्वांना जाऊ दिले. यावेळी ख्रिश्चनांचे प्राण वाचवण्यासाठी बसमधल्या मुस्लिम प्रवाशांनी त्यांना आपला पोषाखही देऊ केला होता. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी होते. प्रवाशांनी एवढी एकजूट दाखवूनही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तिघेजण जखमी झाले.