शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 13:26 IST

चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 21 - चीननं पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा भारतात आल्यानं चीननं आगपाखड केली आहे. बिहारमध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय संमेलनात दलाई लामा सहभागी झाले आहेत. त्यावरून चीननं भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा विचार करून त्याला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये, असंही चीननं सांगितले आहे. दलाई लामा यांना आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागासाठी भारतानं दिलेल्या निमंत्रणाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले, भारताने चीनचा कडवा विरोध पूर्णपणे झुगारुन देत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना बौद्ध धर्मीयांच्या 14व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलावले आणि त्यांनीच या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्या कृत्याचा चीन निषेध करतो, असंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या स्पष्टीकरणात चुनयिंग यांनी म्हटले, की भारताच्या या कृतीवर चीन पूर्णपणे नाराज आहे आणि यास आम्ही कडाडून विरोध करत आहोत आणि भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीन म्हणाला आहे. चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक मुद्द्यांवर भारताला विरोध करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या ह्यएनएसजीह्ण (आण्विक पुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध केला होता. 48 सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीननं म्हटलं होतं. चीन हा भारताला कायम त्रास देण्याचाच प्रयत्न करत असतो.