शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव पोपटामुळे आले नवऱ्याचे ‘प्रकरण’ उघडकीस!

By admin | Updated: October 27, 2016 02:30 IST

पाळीव पोपट ऐकलेले, शिकविलेले जसेच्या तसे हुबेहूब बोलतो, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. अशा ‘पोपटपंची’चे कोडकौतुकही केले जाते, पण अशाच पोपटपंचीमुळे

दुबई : पाळीव पोपट ऐकलेले, शिकविलेले जसेच्या तसे हुबेहूब बोलतो, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. अशा ‘पोपटपंची’चे कोडकौतुकही केले जाते, पण अशाच पोपटपंचीमुळे कुवेतमधील एका पतीचे घरातील मोलकरणीशी असलेले प्रेमसंबंध त्याच्या पत्नीला कळल्याने, या नवरोबांची मोठी पंचाईत झाली.‘अरब न्यूज’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पाळीव पोपटामुळे वैवाहिक संबंधात बिब्बा घातला गेलेल्या या दाम्पत्यातील पती व पत्नी दोघेही नोकरी करतात. एक दिवस पत्नी लवकर घरी आली, तेव्हा तिला पोपटाचे बोलणे नेहमीपेक्षा वेगळे जाणवले. नीट लक्षपूर्वक अनेक वेळा ऐकल्यावर तिच्या लक्षात आले की, तो पोपट तिचा पती आणि त्यांची मोलकरीण यांच्यातील ‘प्रेमसंवाद’ बोलत होता. पतीच्या वागण्यावर तिला आधीपासून संशय होताच. पोपटपंचीने त्याला बळकटी मिळाली. पती घरी आला आणि पत्नीला लवकर घरी आलेले पाहून तो भांबावून गेला. दोघांमध्ये खूप खडाजंगी झाली. पत्नीने पोपटाला बोलायला सांगून ते आक्षेपार्ह प्रेमसंवाद पतीला पुन्हा-पुन्हा ऐकविले, पण पती काही केल्या कबूल झाला नाही.संतापलेली पत्नी तडक कुवेतमधील हवाली पोलीस ठाण्यात गेली आणि तिने पतीविरुद्ध फसवणूक आणि व्यभिचाराची फिर्याद नोंदविली, परंतु यातून पतीविरुद्ध व्यभिचाराचा खटला दाखल करून तो सबळ पुराव्याने सिद्ध करणे शक्य नसल्याचे मत प्रॉसिक्युटरने दिल्याने हे नवरोबा कायद्याच्या कचाट्यातून मात्र बचावले! कुवैतमध्ये विवाहबाह्यसंबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा असून, तो सिद्ध झाल्यास, व्यभिचाऱ्याबद्दल सश्रम कारावासही होऊ शकतो. (वृत्तसंस्था)पोपट कोणाकडून शिकला?‘अरब टाइम्स’च्या वृत्तानुसार पाळीव पोपटाची ही ‘गद्दारी’ पतीच्या अंगलट आली खरी, पण कायद्याच्या कचाट्यातून मात्र तो थोडक्यात बचावला. याचे कारण असे की, पत्नीने तिच्या फिर्यादीत लिहिलेले सर्व खरे मानले, तरी पोपटाचे बोलणे हा पतीविरुद्ध व्यभिचाराचा गुन्हा नोंदवून खटला चालविण्यास विश्वासार्ह आणि ठोस असा पुरावा होऊ शकत नाही, असे प्रॉसिक्युटरचे मत पडले. प्रॉसिक्युटरच्या म्हणण्यानुसार, कदाचित ते प्रेमसंवाद टीव्ही किंवा रेडिओवर ऐकूनही पोपट बोलायला शिकला असेल!पोपटपंची भोवली...पोपटाचे बोलणे नेहमीपेक्षा वेगळे जाणवले. नीट लक्षपूर्वक अनेक वेळा ऐकल्यावर तिच्या लक्षात आले की, तो पोपट तिचा पती आणि त्यांची मोलकरीण यांच्यातील ‘प्रेमसंवाद’ बोलत होता. पोपटपंचीने पतीच्या वागण्यावरील संशयाला बळकटी मिळाली.