शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

बर्दवान स्फोट : सूत्रधाराची पत्नी अटकेत

By admin | Updated: November 24, 2014 09:20 IST

बर्दवान स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराची पत्नी व बांगलादेशातील जेएमबी संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख फातेमा बेगमला इतर तिघांसह आज बांगलादेशात अटक करण्यात आली आहे

ढाका : बर्दवान स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराची पत्नी व बांगलादेशातील जेएमबी संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख फातेमा बेगमला इतर तिघांसह आज बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पाच दहशतवाद्यांनाही अटक झाली असून त्यात एक पाकिस्तानी नागरिक आहे. बांगलादेश पोलिसांनी दहशतवाद्याविरोधातील मोहीम कडक केली असून मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली आहे. फातेमा बेगम ही बर्दवान स्फोटातील प्रमुख आरोपी साजीद याची पत्नी असून, तिने भारतात २५ महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे कबूल केले आहे, असे ढाका पोलीस उपायुक्त मसुदार रेहमान यांनी सांगितले. फातेमा बेगम बांगलादेशातील जमात उल मुजाहिदीन या संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख आहे. बर्दवान येथे २ आॅक्टोबर रोजी स्फोट झाला होता व त्यात दोन जण मरण पावले होते. ढाका शहरातील सदरघाट परिसरात तीन सहकारी, स्फोटके व बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तिला अटक करण्यात आली आहे, असे वृत्त डेली स्टारने दिले आहे. पोलीस प्रवक्ता मोनीरुल इस्लाम याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तपास संस्था एनआयएने फातेमा बेगमची बरीच माहिती दिली होती. एनआयएच्या पथकाने बर्दवान स्फोटासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्या आठवड्यात बांगलादेशला भेट दिली होती. बांगलादेश पोलिसांना १५ मोबाईल फोन नंबर व इतर साहित्य देऊन तपासाला मदत केली होती. (वृत्तसंस्था)