शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तुटलेले डोके पुन्हा देहावर बसविले

By admin | Updated: May 25, 2015 00:43 IST

कार अपघातात पाठीच्या कण्यापासून डोके तुटलेल्या ब्रिटिश माणसाचे प्राण वाचले असून, मूळ भारतीय डॉक्टरने त्याचे तुटलेले डोके पुन्हा बसविले

लंडन : कार अपघातात पाठीच्या कण्यापासून डोके तुटलेल्या ब्रिटिश माणसाचे प्राण वाचले असून, मूळ भारतीय डॉक्टरने त्याचे तुटलेले डोके पुन्हा बसविले. अनंत कामत असे या डॉक्टरचे नाव असून, त्यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली आहे. टोनी कोवान या ब्रिटिश माणसावर त्यांनी शस्त्रक्रिया करून तुटलेले डोके धातूची पट्टी व खिळे यांच्या साहाय्याने परत पाठीच्या कण्याला जोडले आहे. टोनी कोवान हे न्यूकॅसल सिटी येथे राहत असून, गेल्यावर्षी ९ सप्टेंबर रोजी त्यांना अपघात झाला होता. स्पीडब्रेकरवर त्यांची कार धडकली व नियंत्रण सुटून ती जवळच्या टेलिफोनच्या खांबावर आदळली. अपघात होताच कोवान यांचे शिर तुटले व हृदयाची धडधड थांबली. तुटलेले डोके स्नायू व उती यांच्या साहाय्याने शरीराला लटकले होते. हृदय बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी प्रथम कृत्रिम श्वास देऊन हृदय चालू केले. कोवान यांच्या मानेला फ्रॅक्चर झाले होते व पाठीच्या कण्याला जखम झाली होती. अशा जखमा झालेला माणूस कधीच जगत नाही, असे वैद्यकीय शास्त्रात समजले जाते. मात्र, असे असले तरीही कोवान यांच्या मेंदूला काही दुखापत झाली नव्हती. त्यामुळे त्यांचे डोके परत देहावर बसवता आले. (वृत्तसंस्था)