शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनच्या निवडणुकीला मिळाला इंडियन तडका!

By admin | Updated: May 4, 2015 00:29 IST

इंग्लंडमधील निवडणुकीचा संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना या निवडणुकीत सहभागी सर्वच राजकीय पक्ष भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी इंडियन फंडे

लंडन : इंग्लंडमधील निवडणुकीचा संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना या निवडणुकीत सहभागी सर्वच राजकीय पक्ष भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी इंडियन फंडे अजमावत आहेत. दरम्यान, निवडणूक पूर्व चाचणीत ब्रिटीश संसद त्रिशंकू अवस्थेकडे जात असल्याचे चित्र आहे.निवडणुकीच्या प्रचारात बॉलीवूड स्टाईलची गाणी असून, भारतीय पद्धतीने पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची हिंदी आरतीही आहे. ब्रिटनमध्ये १५ लाख भारतीय मतदार असून, त्यांना आकर्षित करण्याची चढाओढ राजकीय पक्ष करीत आहेत. राजकीय नेते देशात ठिकठिकाणी असलेले गुरुद्वारा व मंदिरांना भेट देत आहेत. बॉलीवूड कलाकार अभिषेक बच्चनही भारतीय उमेदवार कीथ वाझ यांच्या प्रचारार्थ उतरला आहे. निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागण्याचीच शक्यता आहे, असे भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांनी म्हटले आहे. इंग्लंडमधील स्थलांतरित मतदारांत भारतीय सर्वाधिक आहेत. राष्ट्रकुल सदस्य असल्यानेही मतदारांची संख्या वाढत असून, मूळ भारतीय मतदार ६ लाख १५ हजारांच्या आसपास जातात. भारतीय उद्योजक जी.पी. हिंदुजा यांच्या मते भारतीय मतदार गटाने मतदान करीत नाहीत. प्रत्येक जण आपल्याला योग्य वाटेल त्या मतदाराला मतदान करतो. मतदानपूर्व सर्वेक्षणाचे निकाल टोरी पक्षाकडे पर्यायाने पंतप्रधान कॅमेरून यांना दिलासा देणारे ठरत आहेत. यू गव्ह.च्या पहिल्या मतदार सर्वेक्षणात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ३४ टक्के मते दाखविली असून, लेबर पक्ष एक टक्का कमी आहे. गुरुवारी ७ मेला होणाऱ्या निवडणुकीत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष जिंकल्यास पंतप्रधान कॅमेरून विजयाची घोषणा करतील.(वृत्तसंस्था)