शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश विमानही बचावले

By admin | Updated: November 8, 2015 02:11 IST

गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये रशियाचे एक विमान गूढरीत्या कोसळून २२४ जण ठार झाले असतानाच एक ब्रिटिश विमानही आॅगस्टमध्ये इजिप्तमध्येच क्षेपणास्त्र हल्ल्यातून

लंडन : गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये रशियाचे एक विमान गूढरीत्या कोसळून २२४ जण ठार झाले असतानाच एक ब्रिटिश विमानही आॅगस्टमध्ये इजिप्तमध्येच क्षेपणास्त्र हल्ल्यातून बचावल्याचे उघडकीस आले आहे. या विमानातही १८९ ब्रिटिश पर्यटक होते.इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे हे विमान २३ आॅगस्ट रोजी उतरत असताना ते क्षेपणास्त्र हल्ल्यातून बालंबाल बचावले. त्यावेळी हे विमान क्षेपणास्त्राच्या टप्प्यापासून अवघे ३०० मीटर दूर होते, असे ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.थॉमसन एअरवेजच्या या विमानाने लंडनच्या स्टान्सटेड विमानतळावरून उड्डाण केले होते. शर्म-अल-शेख विमानतळाजवळ आले असताना ते क्षेपणास्त्रापासून ३०० ते १००० फूट अंतरावर आले होते. क्षेपणास्त्र दिसताच वैमानिकाने कसेबसे सुरक्षित उतरविले आणि प्रवाशांना काहीच सांगितले नाही.एअरलाईन्सच्या नियमानुसार या घटनेबाबत ब्रिटिश परिवहन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. परिवहन विभागानेही अशी घटना घडल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर तेथे जाणाऱ्या विमानांना २६ हजार फुटांच्या खाली परवानगी नाकारण्यात आली आहे, असे एका प्रवक्त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)रशियन विमानावर मिळाले हल्ल्याचे संकेतइजिप्तमध्ये गेल्या आठवड्यात रशियन विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधून विमानात बॉम्बस्फोट झाल्याचे संकेत मिळाले आहेत. माहीतगार सूत्रांनी ही माहिती दिली. विमानाने उड्डाण केल्यानंतर २४ मिनिटांच्या आत फ्लाईट डाटा आणि व्हाईस रेकॉर्डरने काम करणे बंद केले होते.इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथून या विमानाने सेंट पीटस्बर्गसाठी उड्डाण केले होते. विमान सिनाई बेटावर कोसळून त्यातील सर्व २२४ जण ठार झाले होते. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी घडली होती.क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव म्हणाले की, हल्ल्यामुळे हे विमान कोसळले, असा याचा अर्थ नाही. या घटनेचा तपास अजून सुरू आहे; मात्र बॉम्बस्फोट घडवूनच हे विमान पाडण्यात आले, हे ब्लॅक बॉक्स डाटावरून दिसून येते, असे तपासाशी निगडित सूत्रांनी सांगितले.‘इसिस’ने हे विमान पाडल्याचा दावा केला होता; मात्र इजिप्त आणि रशिया या दोघांनीही हा दावा फेटाळून लावला होता; पण या विमानावर ‘बाह्य हल्ला’ झाल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी इजिप्तला जाणारी सर्व विमाने थांबविण्याचा आदेश दिला आहे. इजिप्तमधील पर्यटन उद्योग अगोदरच संघर्ष करीत असताना त्या देशाला जाणारी विमाने रद्द करण्याचा रशियाचा निर्णय इजिप्तला एक मोठा धक्काच मानला जात आहे.