शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाबावरून ठरते मुलगा की मुलगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 10:09 IST

आईच्या पोटातील गर्भातून मुलगा जन्मणार की मुलगी याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. भारतात त्यावर कायद्याने बंदी असली तरी

टोरांटो : आईच्या पोटातील गर्भातून मुलगा जन्मणार की मुलगी याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. भारतात त्यावर कायद्याने बंदी असली तरी गरोदर व्हायच्या आधी महिलेचा रक्तदाब किती आहे यावरून मुलगा जन्मणार की मुलगी हे सांगता येऊ शकेल. गरोदर व्हायच्या आधी आईचा रक्तदाब कमी असेल, तर ती मुलगी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते, असे नव्या अभ्यासात समोर आले आहे. कॅनडातील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील डॉ. रवी रत्नाकरन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांनी यांनी हे संशोधन केले आहे. उच्च रक्तदाब असलेल्या महिलेच्या पोटात मुलगा आकाराला येण्याची जास्त शक्यता असते, असेही अभ्यासातून सूचित होते. कमी रक्तदाबाच्या महिलेची प्रवृत्ती ही मुलीला जन्म देण्याची असते. महिला मुलाला जन्म देणार की मुलीला याच्याशी संबंधित असलेला तिच्या गरोदरपणाच्या आधीचा कमी व उच्च रक्तदाबाचा घटक याआधी विचारात घेण्यात आला नव्हता, असे असे रत्नाकरन म्हणाले. महिला गरोदर राहिल्यापासून जन्मणारे बाळ हे मुलगा की मुलगी याचा अंदाज व्यक्त करणे हा प्रकार जुनाच आहे. गरोदर महिलेच्या अनेक वैशिष्ट्यांवरून गर्भाचे लिंग मुलगा की मुलगी याच्याशी जोडले जाते. हा अभ्यास फेब्रुवारी २००९ मध्ये सुरू झाला. त्यात चीनच्या लियुयांगमधील ३३७५ महिलांना सहभागी करून घेण्यात आले. त्यातील १,६९२ महिलांचा रक्तदाब, कोलेस्टोरॉल, ट्रिग्लिसेराईड्स आणि ग्लुकोजचा अभ्यास करण्यात आला. ज्या २८१ महिलांमध्ये अगदी सुरुवातीलाच गरोदरपणाची लक्षणे दिसली, त्यांना यातून वगळण्यात आले. प्रत्यक्ष बाळंतपणापासून गर्भधारणेचा कालावधी यासाठी विचारात घेण्यात आला. एकूण १,४११ महिलांचा अभ्यास त्यांच्या गर्भधारणेआधी २६.३ आठवड्यांचा करण्यात आला. त्या महिलांपैकी ७३९ मुलाला आणि ६७२ मुलीला जन्म दिला.भारतात मात्र अशा प्रकारच्या चाचण्यांना परवानगी नाही. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधाकांनी त्याला मान्यताही दिलेली नाही. सध्या हे संशोधन प्राथमिक पातळीवरच आहे.