शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्याला मारलेली गोळी परत येऊन लागली

By admin | Updated: August 2, 2015 01:08 IST

शिकारी आपल्याच गोळीने जखमी झाल्याची अनोखी घटना अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात घडली. त्याचे झाले असे की, शिकाऱ्याने गोळी मारल्यानंतर ती प्राण्याच्या कातडीवर धडकून परत

वॉशिंग्टन : शिकारी आपल्याच गोळीने जखमी झाल्याची अनोखी घटना अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात घडली. त्याचे झाले असे की, शिकाऱ्याने गोळी मारल्यानंतर ती प्राण्याच्या कातडीवर धडकून परत शिकाऱ्यालाच लागली. हे वाचून तुम्ही हैराण झाला असाल की, असे कसे घडले. वस्तुत: या व्यक्तीने मध्य अमेरिकेतील टणक कवचधारी आर्माडिलो या प्राण्यावर गोळ्या झाडल्या होत्या. आर्माडिलोच्या शरीरावरील टणक कवच हे बुलेटप्रूफ कवचासारखे असते. त्यामुळे आर्माडिलोचे शिकारी प्राण्यांपासून संरक्षण होते. आपल्या शिकाऱ्याचीच शिकार करणारा हा आर्माडिलो जिवंत आहे की नाही हे समजू शकले नाही; मात्र पोलिसांना या व्यक्तीच्या घराजवळ कुठेही हा प्राणी आढळून आला नाही, त्यामुळे तो जिवंत असावा, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या बागेत एक छोटा प्राणी पाहिल्यानंतर त्याने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याची पत्नी घरातच होती. तो घरातून बाहेर आला व त्याने त्याच्या. ३८च्या रिव्हॉल्व्हरमधून आर्माडिलोवर तीन गोळ्या झाडल्या. तेव्हा एक गोळी आर्माडिलोच्या कवचावर धडकून मागे फिरत झाडणाऱ्याच्या जबड्याला लागली. या व्यक्तीला त्वरित टॅक्सकन शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्या जबड्यावर उपचार करण्यात येत आहेत.