शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला ६ वर्षांची शिक्षा

By admin | Updated: July 6, 2016 14:25 IST

ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली

ऑनलाइन लोकमत
स्टेलेनबोस्च ( दक्षिण आफ्रिका), दि. ६ - 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पिस्टोरियसला तत्काळ तुरूंगात नेण्यात आले. 
२०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता. 
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने ऑस्करला दोषी ठरवत ५ वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावली, मात्र काही काळानंतर त्याची जामिनावरही सुटकाही झाली. त्यानंतर  दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येच्या गुन्हयाखाली दोषी ठरवले होते.  कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. मात्र या शिक्षेला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर ऑस्करला त्याच्या काकांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. अखेर आज झालेल्या सुनावणी दरम्यान त्याला दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
न वर्षांपूर्वी २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी  ऑस्करने त्याच्या घरी  केलेल्या गोळीबारात प्रेयसी रिव्हाचा मृत्यू झाला होता. आपण घरात चोर घुसल्याचे समजून गोळीबार केला. त्यात अनावधानाने रिव्हाचा मृत्यू झाला असा बचाव त्याने केला होता. पॅराऑल्मपिकमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणा-या  ऑस्कर २०१२ लंडन मुख्य ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. शारीरीकदृष्टया अपंग असूनही मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला धावपटू ठरला होता.