शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

इराकी रिफायनरीवर काळे ध्वज

By admin | Updated: June 20, 2014 03:06 IST

इराकच्या सर्वात मोठय़ा तेल प्रकल्पावर (रिफायनरी) सुन्नी दहशतवाद्यांनी आपले काळे ध्वज उभारले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले

बगदाद : इराकच्या सर्वात मोठय़ा तेल प्रकल्पावर (रिफायनरी) सुन्नी दहशतवाद्यांनी आपले काळे ध्वज उभारले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले असून, हा प्रकल्प दहशतवाद्यांच्या ताब्यात गेल्याचे हे संकेत आहेत. इराकच्या उत्तरेकडील मोठा भूभाग दहशतवाद्यांच्या ताब्यात गेला आहे. 
इराकी साक्षीदार बैजी रिफायनरीवरून कारने पुढे आल्यानंतर त्याने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांनी बैजी रिफायनरीच्या आवारात चेकनाके उभारले आहेत, असेही त्याने सांगितले. तेलाच्या एका टँकरला बुधवारी लावलेली आग अजूनही उसळत असल्याचेही त्याने सांगितले. या साक्षीदाराने आपले नाव न छापण्याची अट घातली आहे, अन्यथा नाव प्रकाशित झाल्यास दहशतवादी आपल्यावर कारवाई करतील, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. 
इराकच्या सुरक्षा अधिका:यांनी तेल प्रकल्पावर आपलाच ताबा असल्याचा दावा केला आहे. तेल प्रकल्पाच्या अंतर्भागात अजूनही सरकारी सैनिक तैनात आहेत, तसेच या प्रकल्पाच्या संरक्षणासाठी हेलिकॉप्टर तोफा घिरटय़ा घालत असून, दहशतवाद्यांना पुढे येण्यापासून रोखत आहेत. दहशतवाद्यांनी तेल प्रकल्पाच्या बाहेरचा भाग ताब्यात घेतला आहे. इराकी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी ते आजूबाजूला आग लावत आहेत, असे या अधिका:याने सांगितले. (वृत्तसंस्था)
 
-बैजी तेलप्रकल्पातून देशातील 25 टक्के  भागाला ऊर्जा पुरवठा होतो.  देशांतर्गत वापरासाठी रॉकेल, स्वयंपाकाचे तेल व ऊर्जा प्रकल्पासाठी इंधनही येथूनच पुरविले जाते. हा प्रकल्प दहशतवाद्यांच्या हातात गेल्यास ऊर्जा तुटवडा निर्माण होऊन देशात गोंधळ माजेल, असे या अधिका:याने सांगितले.