शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम गर्भधारणेतून पेंग्विनचा जन्म

By admin | Updated: July 8, 2016 01:13 IST

सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर जपानी वैज्ञानिकांना कृत्रिम गर्भधारणेतून पेंग्विन पक्ष्याचे पहिले पिल्लू जन्माला घालण्यात यश आले आहे. पेन्ग्विनचे कृत्रिम प्रजनन करण्याचा

तोक्यो : सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर जपानी वैज्ञानिकांना कृत्रिम गर्भधारणेतून पेंग्विन पक्ष्याचे पहिले पिल्लू जन्माला घालण्यात यश आले आहे. पेंग्विनचे कृत्रिम प्रजनन करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.ओसाका शहरातील कैईकान मत्स्यालयात हे प्रयोग केले गेले. यातून ‘सदर्न रॉक हॉपर’ प्रजातीच्या पेंग्विनचे पिल्लू महिनाभरापूर्वी जन्माला आले. मत्स्यालयातील कर्मचारी तेव्हापासून त्या पिल्लाचे दररोज वजन करत आहेत. जन्माच्या वेळी ४८.२ ग्रॅम वजन असलेले पिल्लू आता एक किलो २१० ग्रॅम वजनाचे झाले आहे. ही वाढ अपेक्षेहून व पेंग्विनच्या नैसर्गिक वाढीहूनही जास्त असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.कोबे विद्यापीठाच्या कृषिविज्ञान विभागातील सहप्राध्यापक कुसुनोकी हिरोशी यांच्या मदत व मार्गदर्शनाने ओसाका मत्स्यालयाच्या वैज्ञानिकांनी हे कृत्रिम प्रजनन केले. यासाठी या प्रजातीची नैसर्गिक प्रजोत्पत्ती कशी होते याचा सखोल अभ्यास केला गेला. नंतर तोक्यो सी लाईफ पार्कच्या मदतीने या प्रजातीच्या सुदृढ पुरुष पेन्ग्विनचे शुक्राणु मिळवून त्यातून हे पिल्लू जन्माला घालण्यात आले. (वृत्तसंस्था)‘सदर्न रॉक हॉपर’ प्रजातीचे पेंग्विन अंटार्क्टिकाजवळ फॉकलंडसह इतर बेटांवर आढळतात. ही प्रजाती विनष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षण संघटनेने त्यांचा समावेश लाल यादीत केला आहे.